स्टंटसाठी मिला जोवोव्हिचने सोसल्या नरक यातना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 03:29 PM2017-01-20T15:29:03+5:302017-01-20T20:59:32+5:30
पुरुष सुपरहिरो आणि अॅक्शन हीरो तुम्ही खूप सारे पाहिले असतील. अॅक्शन सिनेमांत तर अभिनेत्यांचीच चलती असते. परंतु याला अपवाद ...
प रुष सुपरहिरो आणि अॅक्शन हीरो तुम्ही खूप सारे पाहिले असतील. अॅक्शन सिनेमांत तर अभिनेत्यांचीच चलती असते. परंतु याला अपवाद म्हणजे हॉलीवूड अभिनेत्री मिला जोवाव्हिचचा. ‘रेसिडेंट ईव्हिल: द फायनल चाप्टर’ या आगामी चित्रपटातील सर्व स्टंट मिलाने स्वत: केले असून त्यासाठी त्याने खूप नरक यातना सोसल्या आहेत.
ती सांगते, ‘खरं सांगू तर चित्रपटाचा दिग्दर्शक पॉल अँडरसनने मला खूप त्रास दिला आहे. इतके अवघड आणि कठीण स्टंट व अॅक्शन सीन्स त्याने माझ्याकडून करून घेतले. पटकथेनुसार आम्हाला अत्यंत खडतर परिस्थित शूटींग करायची होती. कधी खराब तलावात तर कधी कॅ नडाच्या कडाक्याची थंडीत उणे २० डिग्री तापमानात पहाटे २ वाजता बाहेर तर कधी नोव्हेंबर महिन्यात पावसात आम्ही शूटींग केली.’
‘रेसिडेंट एव्हिल’ या चित्रपट सिरीजमधील हा सहावा आणि शेवटचा भाग आहे. या सर्व चित्रपटांसाठी तिला कराव्या लागणाऱ्या स्टंट्सचा विचार केला असता तिच्या जीवनातील पहिल्या जीवघेण्या गोष्टींचा त्यामध्ये नक्कीच समावेश होईल, असे ती सांगते. अत्यंत लोकप्रिय अशा सिरीजचा शेवट ‘द फायनल चाप्टर’द्वारे होत आहेत.
सायन्स फिक्शन अॅक्शन हॉरर श्रेणीतील या चित्रपटाचे जगभर चाहते आहेत. मिला जोवोव्हिचसोबत यामध्ये अली लार्टर, शॉन रॉबर्ट्स, रुबी रोझ, एवॉईन हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘रेसिडेंट ईव्हिल’ रेट्रिब्युशन’ या पाचव्या भागाच्या पुढील कथानक या ३ फे ब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
ALSO READ: विदेशी हीरोईन्सचा अॅक्शन धमाका