Mumbai Airport Justin Bieber : विमानतळावर दिसला जस्टिन बीबरचा स्वॅग, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 12:34 PM2024-07-05T12:34:40+5:302024-07-05T12:38:36+5:30

जस्टिन बीबर नुकताच मुंबई विमानतळावर दिसला.

Justin Bieber at Mumbai Airport video viral will perform tonight for Anant and Radhika’s sangeet ceremony | Mumbai Airport Justin Bieber : विमानतळावर दिसला जस्टिन बीबरचा स्वॅग, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Airport Justin Bieber : विमानतळावर दिसला जस्टिन बीबरचा स्वॅग, व्हिडिओ व्हायरल

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी व त्याची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील 'अँटिलिया' या निवासस्थानी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहेत. विविध कार्यक्रमासाठी पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली आहे.  आज संध्याकाळी म्हणजेच ५ जुलै रोजी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या संगीत कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बीबर परफॉर्म करणार आहे.

जस्टिन बीबर नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी त्याने गुलाबी रंगाचा ओव्हरसाईज टी-शर्ट आणि लाल रंगाची टोपी घातलेली होती. विमानतळावरील जस्टिन बीबरचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई विमानतळावर जस्टिनचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्याचं दिसून आलं. त्याला पाहताच लोकांनी आरडाओरडा सुरू केला. चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एवढेच नाही तर जस्टिनने पापाराझींना पोजही दिली. आज संध्याकाळी होणाऱ्या संगीत सोहळ्याच्या व्हिडिओची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

 रिपोर्टनुसार, लग्नात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन बिबर याने तब्बल 10 मिलियन डॉलर म्हणजे 83 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. आता सर्वत्र भारतात दाखल झालेल्या जस्टिन बीबर याची चर्चा रंगली आहे. जस्टिन बीबरचे विदेशातच नव्हे तर भारतातही अनेक चाहते आहेत. जस्टिन बीबर याच्या चाहत्यांची संख्या भारतात देखील फार मोठी आहे. 

जस्टिन शिवाय, अँटेलिया हाऊसमध्ये होणाऱ्या या संगीत सोहळ्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह देखील परफॉर्म करणार असल्याची माहिती आहे. जस्टिन बीबरच्या आधी अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये रिहाना आणि अमेरिकन सिंगर केटी पेरी यांनीही परफॉर्मन्स दिला होता. दोन्ही स्टार्सनी त्यांच्या परफॉर्मन्ससाठी मोठी रक्कम आकारली होती. 

Web Title: Justin Bieber at Mumbai Airport video viral will perform tonight for Anant and Radhika’s sangeet ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.