रॅपर कान्ये वेस्टने चक्क ग्रॅमी अवार्ड ट्रॉफीवर केली लघुशंका, व्हिडीओ पाहून सगळ्यांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 04:44 PM2020-09-18T16:44:34+5:302020-09-18T16:46:04+5:30
सगळेच हैराण...
अमेरिकन टीव्ही स्टार किम कर्दाशियनचा पती आणि अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याने शेअर केलेला व्हिडीओ पाहून सगळेच हैराण आहेत. कान्ये वेस्ट असे कसे करू शकतो? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सगळीकडे या व्हिडीओची चर्चा आहे. कान्येने शेअर केलेल्या या व्हिडीओत एक ग्रॅमी अवार्ड ट्रॉफी दिसतेय. ही ट्रॉफी कमोडच्या पॉटमध्ये पडलेली दिसतेय आणि त्यावर कोणीतरी लघुशंका करतोय.
ग्रॅमी अवार्डच्या ट्रॉफीवर लघुशंका करणारी व्यक्ती खुद्द कान्ये आहे की आणखी कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण कान्येने हा व्हिडीओ शेअर केल्याने प्रत्येकाला धक्का बसला आहे. जो ग्रॅमी अवार्ड जिंकणे प्रत्येकाचे स्वप्न असते, त्या ग्रॅमी अवार्डचा हा अपमान पाहून प्रत्येकजण शॉक्ड झाला.
Trust me ... I WONT STOP pic.twitter.com/RmVkqrSa4F
— ye (@kanyewest) September 16, 2020
‘विश्वास ठेवा, मी थांबणार नाही,’ असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओवरून सध्या कान्येवर टीकेची झोड उठली आहे. हा ग्रॅमी अवार्डचा अपमान असल्याचे म्हणत अनेकांनी कान्येला ट्रोल करणे सुरु केले आहे.
ALL THE MUSICIANS WILL BE FREE
— ye (@kanyewest) September 16, 2020
यापूर्वी कान्येने ट्विटरवर त्याच्या संगीत कराराची पाने शेअर केली होती. मी या आधुनिक काळातील गुलामगिरीतून मुक्त होऊ इच्छितो, असे या ट्विटसोबत त्याने लिहिले होते. आपल्या म्युझिकल कॉन्ट्रॅक्टमधील अटींमुळे कान्ये संतापला असल्याचे यावरून दिसते. कान्येचा हा 8 सेकंदाचा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल पण कान्येने आत्तापर्यंत 21 ग्रॅमी अवार्ड जिंकले आहेत. रॅपर कान्ये वेस्ट हा अमेरिकन टीव्ही स्टार किम कार्दशियन हिचा पती आहे. किम आणि कान्ये यांनी 2014 मध्ये विवाह केला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा
अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याने अलीकडे अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती.
या वर्षाच्या शेवटी अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप आणि जो बिडेन यांच्याच मुकाबला होणार असताना कान्ये वेस्ट याने ही निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती़ ‘ईश्वरावर विश्वास ठेवून आपल्या अमेरिकेला दिलेली वचनं समजून घ्यायला हवीत. एका नव्या व्हीजनसह देशाच्या भविष्याबाबत विचार करायला हवा. मी अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार आहे’,असे त्याने ही घोषणा करताना म्हटले होते.