केटी प्राइस एक्स बॉयफ्रेंडवर भडकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2017 03:52 PM2017-02-19T15:52:50+5:302017-02-19T21:22:50+5:30

ब्रिटिश टीव्ही अभिनेत्री व मॉडल केटी प्राइस तिचा एक्स बॉयफ्रेंड ड्वाइट यॉर्क याच्यावर चांगलीच संतापली आहे. या संतापाचे कारण ...

Katie Price Strikes on X Boyfriend! | केटी प्राइस एक्स बॉयफ्रेंडवर भडकली!

केटी प्राइस एक्स बॉयफ्रेंडवर भडकली!

googlenewsNext
रिटिश टीव्ही अभिनेत्री व मॉडल केटी प्राइस तिचा एक्स बॉयफ्रेंड ड्वाइट यॉर्क याच्यावर चांगलीच संतापली आहे. या संतापाचे कारण त्यांचा मुलगा असून, ड्वाइट यॉर्क त्याला भेटण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा तिने आरोप केला आहे. ड्वाइटला नुकतेच त्याच्या पासपोर्टवर इराणचा स्टॅम्प मारलेला असल्याने त्याला अमेरिकेत प्रवेश नाकारला होता. 

मिरर डॉट कॉ डॉट यूके या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मेनचेस्टर युनायटेडचा माझी खेळाडू असलेल्या यॉर्कवर प्राइसने आरोप लावला की, यॉर्क अमेरिकेला जाण्यास आतूर आहे, परंतु आपल्या १४ वर्षीय मुलाला भेटण्यासाठी तो वेस्ट ससेक्सला येऊ शकत नाही. यावेळी प्राइसने ट्विटही केले. त्यात म्हटले की, ‘तू तुझ्या मुलाला भेटण्यासाठी का येत नाही? तो गेल्या दहा वर्षांपासून तुझी वाट पाहत आहे.’
गार्जियन या साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार यॉर्कने म्हटले होते की,  माझ्या पासपोर्टवर इराणी स्टॅम्प असल्या कारणाने मला अमेरिकेत प्रवेश नाकारला होता. २०१५ मध्ये तेहरानमध्ये एका चॅरिटी फुटबॉल मॅचदरम्यान पासपोर्टवर हा स्टॅम्प मारण्यात आला होता. 



केटी प्राइस तिचा एक्स बॉयफ्रेंड ड्वाइट यॉर्क आणि मुलगा हार्वे 
यापूर्वीदेखील प्राइसने यॉर्कवर अशाप्रकारचे आरोप लावलेले आहेत. यॉर्क मुलाला पुरेसा वेळ देत नसल्याचे तिचे म्हणणे होते. हार्वे अंध असून, इतरही बºयाचशा आजाराने तो ग्रस्त आहे. याच मुद्याचा आधार घेत प्राइसने तिच्या आत्मकथेत म्हटले होते की, मुलगा हार्वे अंध असल्या कारणाने यॉर्क त्याचा स्वीकार करण्यास नकार देत आहे. दरम्यान, यॉर्कने अद्यापपर्यंत प्राइसच्या या ट्विटला उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता प्राइस पुढचा काय पवित्रा घेईल हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Katie Price Strikes on X Boyfriend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.