VIDEO : Katy Perry ने घातले असे कपडे की खुर्चीवरून पडली धडाम्, स्वत:हून उठणंही झालं अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 02:24 PM2022-05-04T14:24:04+5:302022-05-04T14:26:09+5:30

Katy Perry falls from chair video : केटीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ बघू शकता की, केटीने अमेरिकन आयडलच्या या एपिसोडमध्ये मर्मेड म्हणजे जलपरीचा लूक केला आहे.

Katy Perry falls from chair while dressed as mermaid on American idol watch video | VIDEO : Katy Perry ने घातले असे कपडे की खुर्चीवरून पडली धडाम्, स्वत:हून उठणंही झालं अवघड

VIDEO : Katy Perry ने घातले असे कपडे की खुर्चीवरून पडली धडाम्, स्वत:हून उठणंही झालं अवघड

googlenewsNext

प्रसिद्ध अमेरिकन सिंगर केटी पेरी (Katy Perry) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या ड्रेसमुळे झालेल्या फजितीमुळे किंवा कधी तिच्या बोल्ड स्टेटमेंटमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता तिचा खुर्चीतून पडण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केटीचा हा व्हिडीओ अमेरिकन आयडॉलच्या सेटवरील आहे. इथे ती खुर्चीवरून बसल्या बसल्या पडली.

केटीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ बघू शकता की, केटीने अमेरिकन आयडलच्या या एपिसोडमध्ये मर्मेड म्हणजे जलपरीचा लूक केला आहे. याच लूकमध्ये ती खुर्चीवर बसली आहे. शो दरम्यान होस्ट टॉप १० स्पर्धकांबाबत सांगत होता तेव्हाच अचानक धडाम् असा आवाज आला. केटी खुर्चीवरून खाली पडण्याचा तो आवाज होता. लगेच सगळे तिच्या मदतीसाठी धावले.

खुर्चीवरून पडल्यावर केटीला तिचे सहकारी जर सांभाळतात आणि उचलण्याचा प्रयत्न करतात. हा लाजिरवाणा क्षण सर्वांना हसून फनी बनवण्याचा प्रयत्न केला. केटीही यात हसताना दिसली. होस्टने तिला पुन्हा उचलून खुर्चीवर बसवलं. पण या घटनेमुळे शोमध्ये सगळे लोक हसू लागले होते.

एखाद्या चारचौघात घडलेल्या अशा घटनेला गमतीत कसं घ्यायचं हे केटीकडून शिकायला हवं. याआधी एका शो दरम्यान तिची पॅंट मागून फाटली होती. पण जराही पॅनिक न होता स्पॉटबॉयकडून टेप मागवला आणि पॅंटवर चिकटवला. तसाच तिने पूर्ण शो केला. याा व्हिडीओही व्हायरल झाला होता.
 

Web Title: Katy Perry falls from chair while dressed as mermaid on American idol watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.