कोरोनाचा फटका पडला या प्रसिद्ध सिंगरला, कॅन्सल केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 13:17 IST2020-03-07T13:15:53+5:302020-03-07T13:17:02+5:30
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी या गायिकेनं लग्नदेखील कॅन्सल केलं आहे.

कोरोनाचा फटका पडला या प्रसिद्ध सिंगरला, कॅन्सल केलं लग्न
हॉलिवूड पॉप सिंगर केटी पेरी आणि अभिनेता ऑरलैंडो ब्लूमने त्यांचे लग्न रद्द करून पुढे ढकलले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार केटी पेरी व ब्लूमने कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेतला. केटी आणि ऑरलैंडो जपानमध्ये लग्न करणार होते. मात्र जपावमध्ये सध्या कोविड १९ म्हणजेच कोरोना व्हायरसची बाधा होत आहे. त्यामुळे दोघांनी तिथे जाण्याचे रद्द केले.
सूत्रांनी दिलेल्या एण्टरटेन्मेंट टूनाइटला सांगितले की, कोरोना व्हायरसच्या घातक प्रभावामुळे केटी पेरी व ऑरलैंडो ब्लूम यांनी त्यांच्या ग्रॅण्ड वेडिंग प्लानचा पुन्हा विचार केला आणि लग्न पुढील वर्षात करण्याचा निर्णय घेतला. आता केटी पेरी व ऑरलैंडो २०२१ साली लग्न करतील. तोपर्यंत पेरी पहिल्या बाळाची आई झाली असेल.
बुधवारी अमेरिकन सिंगर केटी पेरीने आपल्या चाहत्यांना सरप्राइज गिफ्ट दिले. तिने नवीन म्युझिक व्हिडिओ नेवर वॉर्न व्हाईट लाँच केला. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीबद्दल जाहीर केलं. यासोबतच केटीने इंस्टाग्रामवर एका लाइव्ह चॅटदरम्यान तिच्या बेबी बंपची झलकही चाहत्यांना दाखवली.
केटी पेरीचे पहिले आणि तिचा फियॉन्से ऑरलैंडो ब्लूमचे दुसरे बाळ असणार आहे. केटी पेरी व ब्लूमने फेब्रुवारी २०१९ साली एगेंजमेंट केली होती.
पेरीने इंस्टाग्रामवर रिंगचे फोटो शेअर करून एगेंज झाल्याचं जाहीर केले होते.