आली लहर, केला कहर..! Kim Kardashianनं केसांसोबत आयब्रोचाही बदलला रंग, चाहते झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 19:27 IST2022-09-07T19:27:23+5:302022-09-07T19:27:58+5:30
Kim Kardashian : हॉलिवूड स्टार किम कार्दशियनने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

आली लहर, केला कहर..! Kim Kardashianनं केसांसोबत आयब्रोचाही बदलला रंग, चाहते झाले हैराण
हॉलिवूड स्टार किम कार्दशियनने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. किमने एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केले आहे, जे पाहून सर्व चकीत झाले आहे. किम कार्दशियनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर मॅगझिन फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये किमचा लूक जितका बोल्ड आहे तितकीच तिची स्टाईलही वेगळी आहे.
किम कार्दशियनने तिच्या मासिकाच्या कव्हर फोटोशूटसाठी जीन्सच्या आत बिकिनी बॉटम ऐवजी जॉकस्ट्रॅप घातला होता. विशेष बाब म्हणजे किमने जीन्सच्या आत नुसती जॉकस्ट्रॅप तर घातलीच नाही, तर तिने ती फ्लॉंटही केली आहे. किम कार्दशियनच्या या बोल्ड फोटोंवरून चाहत्यांची नजर हटत नाही. बोल्ड लूक व्यतिरिक्त, किमने तिच्या केसांचा आणि भुवयांचा रंग बदलून चाहत्यांना चकित केले आहे. नवीन फोटोशूटच्या फोटोंमध्ये किम ब्लॉन्ड केसांमध्ये दिसली. तसेच तिने तिच्या आयब्रोवर ब्लॉन्ड कलर केला आहे.
किम कार्दशियनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅगझिनचे फोटो शेअर केले आहेत. ब्लॉन्ड केस आणि ब्लीच केलेल्या आयब्रोमध्ये किमचा लूक एकदम वेगळा आहे. किम याआधीही ब्लॉन्ड केसांमध्ये दिसली होती, मात्र ब्लीच केलेल्या ब्लॉन्ड आयब्रोमध्ये किमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किमने अमेरिकेच्या झेंड्यासमोर तिचे बोल्ड फोटोशूट केले आहे. मॅगझिनच्या कव्हर फोटोवर ऑल डेनिम लूकमधील किमचा लूक पाहण्यासारखा आहे. पण ज्या बोल्ड स्टाईलमध्ये किमने पॅन्ट खाली सरकवून पोज दिली आहे, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
एका फोटोत किमने बिकिनी बॉटम असलेले ब्लॅक जॅकेट घातले आहे. फोटोशूटमधील आणखी एका फोटोमध्ये किमने जीन्ससोबत पांढरा टँक टॉप घातला आहे. किम कार्दशियन हॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक आहे. फोटोशूटपासून ते रिअॅलिटी शो आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंत किम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता किमच्या नव्या फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.