किम कार्दशियानने लिलावात खरेदी केला प्रिन्सेस डायनाचा एक नेकलेस, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 03:17 PM2023-01-19T15:17:28+5:302023-01-19T15:20:18+5:30

Kim Kardashian : शेवटच्या 5 मिनिटांमध्ये किमने यासाठी सगळ्यात जास्त बोली लावत नेकलेस खरेदी केला. हा नेकलेस दिवंगत प्रिन्सेस डायनाने घातला होता. आता तो किमचा झाला आहे.

Kim Kardashian purchased princess Diana dianmond pendent neckless in crores rupees | किम कार्दशियानने लिलावात खरेदी केला प्रिन्सेस डायनाचा एक नेकलेस, जाणून घ्या किंमत

किम कार्दशियानने लिलावात खरेदी केला प्रिन्सेस डायनाचा एक नेकलेस, जाणून घ्या किंमत

googlenewsNext

Kim Kardashian : अमेरिकन टीव्ही रिअॅलिटी स्टार आणि मॉडल किम कार्दशियान (Kim Kardashian) ने प्रिन्सेस डायनाचा एक नेकलेस खरेदी केलाय. हा नेकलेस तिने लिलावात खरेदी केला. ऑक्शन हाउस सोथबीनुसार, हा नेकलेस 1920 मध्ये ब्रिटिश ज्वेलर गॅर्राडने तयार केला होता. हा लंडनमध्ये 162,800 डॉलरमध्ये विकला जाणार होता. लिलावात चार लोकांनी बोली लावली होती. पण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये किमने यासाठी सगळ्यात जास्त बोली लावत नेकलेस खरेदी केला. हा नेकलेस दिवंगत प्रिन्सेस डायनाने घातला होता. आता तो किमचा झाला आहे.

किम कार्दशियानने हा नेकलेस जवळपास 197453 डॉलरमध्ये खरेदी केला. हिरे जडीत हा नेकलेस भारतीय करन्सीनुसार जवळपास 1.6 कोटी रूपयांचा आहे. लिलाव करणाऱ्या संस्थेने सांगितलं की, दिवंगत प्रिन्सेस डायनाच्या मालकीचे किंवा त्यांनी वापरलेले दागिने फार कमी बाजारात येतात. खासकरून हा अट्टालाह क्रॉससारखा हा दागिना. जो फार रंगीत आहे. बोल्ड आणि खास आहे.

या लिलावात हा नेकलेस जवळपास दुप्पट किंमतीत विकला गेला आहे. किमला अशा ऐतिहासिक वस्तू खरेदी करण्याची फार आवड आहे. तिने मर्लिन मुनरोचा एक ड्रेसही लिलावात खरेदी केला होता. हा ड्रेस घालून ती मेट गालामध्ये गेली होती. मर्लिनचा हा ड्रेस यामुळे खास होता कारण तिने हा ड्रेस 1962 मध्ये राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या जॉन एफ केनेडी यांच्या वाढदिवसाला घातला होता.

Web Title: Kim Kardashian purchased princess Diana dianmond pendent neckless in crores rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.