किम कार्दशियनचं २०११ सालातलं ट्विट होतंय व्हायरल, किंग खानबद्दल केलं होतं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:36 PM2023-10-02T20:36:15+5:302023-10-02T20:36:54+5:30

२०११ साली किम कार्दशियनने शाहरुख खानबद्दल एक ट्विट केले होते. जे आता चर्चेत आले आहे.

Kim Kardashian's 2011 tweet is going viral, she made a statement about King Khan | किम कार्दशियनचं २०११ सालातलं ट्विट होतंय व्हायरल, किंग खानबद्दल केलं होतं वक्तव्य

किम कार्दशियनचं २०११ सालातलं ट्विट होतंय व्हायरल, किंग खानबद्दल केलं होतं वक्तव्य

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख देशातच नाही तर जगभरात किंग ऑफ रोमान्स या नावाने लोकप्रिय आहे. त्याची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींशिवाय विदेशी स्टार्सही शाहरुख खानला पसंत करतात. अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी आपण शाहरुख खानचे चाहते असल्याचे मान्य केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, किम कार्दशियननेही शाहरुख खानबद्दल ट्विट केले आहे. होय, २०११ मध्ये किम कार्दशियनने शाहरुख खानबद्दल एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये ती काय म्हणाली, ते जाणून घेऊयात.

या ट्विटमध्ये किमने लिहिले की, "Shiraz.com ने मला नुकतेच शाहरुख खानचे काही बॉलिवूड चित्रपट पाठवले आहेत. ते पाहण्यासाठी मी थांबू शकत नाही." त्यावेळी किम कार्दशियनच्या या ट्विटवर भारतीय चाहत्यांनी खूप कमेंट केल्या होत्या. कमेंट सेक्शनमध्ये त्याने किमला शाहरुखच्या काही सर्वोत्तम चित्रपटांची माहिती दिली होती. अशा परिस्थितीत जेव्हा किमचे हे ट्विट पुन्हा व्हायरल झाले तेव्हा या ट्विटवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 

या ट्विटवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, "तुम्ही जवान पाहा." तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, "तुम्ही सलमान खानला ओळखता का?" दुसऱ्या युजरने लिहिले की, पठाण आणि जवान बघा. आणखी एका युजरने लिहिले की, "तुम्ही शाहरुख सरांचे फॅन आहात. तुम्ही त्यांचा नुकताच रिलीज झालेला जवान पाहावा." अशाप्रकारे किम कार्दशियनच्या या जुन्या ट्विटवर यूजर्सच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
 

Web Title: Kim Kardashian's 2011 tweet is going viral, she made a statement about King Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.