सरोगसी पद्धतीने हवे किम तिसरे मुल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2016 06:32 PM2016-11-08T18:32:15+5:302016-11-08T18:34:15+5:30

दोन मुलांची आई असलेली रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दशियां हिने तिसºया मुलाचेही संकेत दिले आहेत. अर्थात हे मुल तिला ...

Kim Third Child | सरोगसी पद्धतीने हवे किम तिसरे मुल

सरोगसी पद्धतीने हवे किम तिसरे मुल

googlenewsNext
न मुलांची आई असलेली रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दशियां हिने तिसºया मुलाचेही संकेत दिले आहेत. अर्थात हे मुल तिला सरोगसी पद्धतीने हवे आहे. यावर ती विचार करीत असल्याचे समजते. 
कीपिंग अप विद द कर्दशियंस या शोच्या नव्या अ‍ॅपिसोडच्या प्रोमोमध्ये किमने सांगितले की, ‘आता मी... या निष्कर्षावर येवून पोहोचली... मी आता केवळ सरोगसीवर विचार करू इच्छिते’ किमच्या या निर्णयामुळे तिची आई क्रिस जेनर हिला धक्का बसला आहे. किमने तिसºयाही मुलाला तिच्या गर्भातूनच जन्म द्यावा अशी तिची इच्छा आहे. मात्र किम सरोगसी पद्धतीचा विचार करीत असल्याने सध्या तिच्या कुटुंबात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. 
दरम्यान किम आणि तिचा पती कान्ये वेस्ट यांना मुलगी नॉर्थ वेस्ट आणि मुलगा सेंट वेस्ट अशी दोन मुले आहेत. दोन्ही मुलांचा उत्तमरित्या सांभाळ व्हावा यासाठी दोघेही लक्षपूर्वक जाबबदारी पार पाडत आहेत. दोघांचे मुलांप्रतीचे प्रेम बघण्यासारखे आहे. जेव्हा किम कामानिमित्त बाहेर असते तेव्हा कान्ये वेस्ट मुलांचा सांभाळ करीत असतो. तर जेव्हा कान्ये वेस्ट बाहेर असतो तेव्हा किम मुलांचा सांभाळ करते. 
किमने यापूर्वीच आणखी एका मुलाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु ते मुल सरोगसी पद्धतीने हवे असल्याचा किमने खुलासा केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

Web Title: Kim Third Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.