बाबो,प्रसिद्ध सेलिब्रेटीच्या कुत्र्यांची झाली चोरी, शोधून देणा-याला मिळणार 3.65 कोटींचे बक्षीस !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 06:42 PM2021-02-26T18:42:44+5:302021-02-26T18:47:43+5:30
हा डॉग वॉकर लेडी गागाच्या तीन कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन गेला होता. यापैकी दोन कुत्रे चोरीला गेले, तर एकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. नंतर त्याला शोधण्यात यश आले.
प्रसिद्ध पॉप सिंगर लेडी गागाच्या लॉस एंजेलिसमधील घराबाहेर हल्ला झाल्याने सा-यांनाच धडकी भरली आहे .लेडी गागाकडे फ्रेन्च बुलडॉग जातीचे तीन कुत्रे होते. २०१६ मध्ये तिने हे कुत्रे घेतले होते. एका व्यक्तीने लेडी गागाच्या पाळीव कुत्र्यांवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता. यांत डॉग वॉकरला गोळी लागली. सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला आहे. हा डॉग वॉकर लेडी गागाच्या तीन कुत्र्यांना बाहेर फिरायला घेऊन गेला होता. यापैकी दोन कुत्रे चोरीला गेले, तर एकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. नंतर त्याला शोधण्यात यश आले.
आता दोन कुत्र्यांचा शोध सुरु आहे. दोन कुत्रे कोजी आणि गुस्ताव यांना शोधण्यासाठी लेडी गागाने मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर शोधून आणणा-याला कोणतीही प्रश्नोत्तरे केली जाणार नाहीत, हेदेखील सांगण्यात आले आहे. कुत्र्यांना शोधून काढणा-याला लेडी गागाकडून 3.65 कोटींचे बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गागा बर्याचदा तिच्या कुत्र्यांसह फोटो सोशल मीडियावर शेअर करते. गागाने कुत्र्सांसाठी सुरु केलेली शोध मोहिमेची माहिती देण्यासाठी एक ईमेल आयडीही बनवला आहे. ज्या कोणालाही या कुत्र्यांविषयी काही माहिती कळेल तो KojiandGustav@gmail.com वर संपर्क साधू शकतो. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळेस लेडी गागा तिच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग करत होती. लेडी गागा सध्या रोममध्येच शूटिंगमध्ये बिझी आहे.
लेडी गागाचं तिच्या कुत्र्यांवर प्रचंड प्रेम असून ती त्यांची काळजी घेण्यात कुठलीही कसर कमी पडू देत नाही. त्यांच्या खाण्या-पिण्यापासून प्रत्येक गोष्टीवर तिचं बारीक लक्ष असतं. कुत्र्यांवर झालेला जीवघेणा हल्ल्यामुळे ती प्रचंड चिंतेत असून त्यांना शोधण्यासाठी वाटेल ते करायला तिची तयारी आहे.
लेडी गागानं या ठिकाणी दिलेल्या परफॉर्मन्सनं सर्वांचीच मनं जिंकली. तर दुसरीकडे लेडी गागाच्या हटके लूकचीही जोरदार चर्चा झाली. लेडी गागानं या शपथविधी सोहळ्यात अमेरिकेचं राष्ट्रगीत गायलं होतं.या सोहळ्यादरम्यान तिचा लूकही चर्चेचा विषय ठरला होता. लेडी गागानं Schiaparelli Haute Couture स्टाईलचा गाऊन परिधान केला होता. तसंच लाल रंगाचा लांब स्कर्टही परिधान केला होता. तिचा हा लूक सा-यांसाठी खास आकर्षण ठरले होते.