​‘लोकप्रियता’ ठरतेय लेडी गागाच्या ‘क्रिएटिव्हिटीला’ मारक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 04:50 PM2016-10-20T16:50:27+5:302016-10-20T16:50:27+5:30

संपूर्ण जगात आपल्या नावाची चर्चा असावी, लोकांना आपल्याला ओळखावे, स्टार्ससारखी फॅन फॉलोविंग असावी, असे कोणाला वाटत नाही? परंतु काही ...

Lady Gaga's creativity killed as 'popularity' | ​‘लोकप्रियता’ ठरतेय लेडी गागाच्या ‘क्रिएटिव्हिटीला’ मारक

​‘लोकप्रियता’ ठरतेय लेडी गागाच्या ‘क्रिएटिव्हिटीला’ मारक

googlenewsNext
पूर्ण जगात आपल्या नावाची चर्चा असावी, लोकांना आपल्याला ओळखावे, स्टार्ससारखी फॅन फॉलोविंग असावी, असे कोणाला वाटत नाही? परंतु काही सेलिब्रेटी असे असतात जे अशा प्रसिद्धीपासून दूर राहू पाहतात. लेडी गागा ही अशाच काही निवडक कलाकारांपैकी एक आहे.

जगप्रसिद्ध पॉप स्टार लेडी गागाचे संपूर्ण जगात चाहते आहेत. तिच्या गाण्यांनी अनेक विक्रम रचले आणि मोडीत काढले. अशा सुपर सक्सेसफुल आणि पॉप्युलर गायिकेला मात्र आता ही प्रसिद्धी आता नकोशी वाटू लागली आहे.

ती म्हणते की, यश आणि लोकप्रियता कलाकाराला खऱ्याखुऱ्या जगापासून दूर नेते. मला गाणी लिहिण्यासाठी सामान्य लोकांच्या जीवनातील अनुभव आणि प्रेरणा फार महत्त्वाची आहे. परंतु मी जेथे जाते तेथे लोक माझ्याशी दोन शब्द मोकळेपणाने बोलण्याऐवजी माझ्या नावाचा जप करत केवळ फोटो काढण्यासाठी गर्दी करतात. अशाने मला त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळत नाही.

‘पोकरफेस’ हिटमेकर गागा सांगते की, ‘मानवी प्रेरणेतूनच खरी कला निर्माण होत असते. सामान्य लोकांशी बोलनू, त्यांच्यामध्ये मिळून-मिसळून त्यांचे आयुष्य समजून घेऊन, ते अनुभव गाण्याच्या स्वरुपात व्यक्त करण्याचा माझा हेतू असतो. लोक केवळ देखाव्यावर भुलतात. या ग्लॅमर पलीकडे जाऊन जनसामान्यांच्या मनातील आवाज माझ्या गाण्यात कैद करता आला तर मला खरा आनंद होतो.’

Web Title: Lady Gaga's creativity killed as 'popularity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.