मॅडोनाचे किमला भावनिक पाठबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 07:44 PM2016-11-27T19:44:03+5:302016-11-27T19:50:06+5:30

प्रसिद्ध पॉप गायिका मॅडोना रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार किम कर्दशिया हिच्यासोबत पॅरिस येथे झालेल्या दरोड्याच्या घटनेनंतर सातत्याने तिच्या संपर्कात आहे. मॅडोना ...

Madonna's emotional support | मॅडोनाचे किमला भावनिक पाठबळ

मॅडोनाचे किमला भावनिक पाठबळ

googlenewsNext
रसिद्ध पॉप गायिका मॅडोना रिअ‍ॅलिटी टीव्हीस्टार किम कर्दशिया हिच्यासोबत पॅरिस येथे झालेल्या दरोड्याच्या घटनेनंतर सातत्याने तिच्या संपर्कात आहे. मॅडोना किमला भावनिक आधार देत असल्याने किमही काहीशी त्या घटनेतून सावरत असल्याचे दिसत आहे.  


एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार मॅडोनाने स्वत:हून खुलासा केला की, वयाच्या १९व्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये बंदुकीचा धाक दाखवून तिचे यौनशोषण केले होते. तिच्याशी घडलेल्या या घटनेची किमसोबत पुनर्रावृत्ती होताना टळली याचा तिला काहीसा दिलासा वाटत आहे. परंतु किम या घटनेमुळे प्रचंड घाबरलेली असल्याने ती सातत्याने तिला भावनिक पाठबळ देण्याचे काम करीत आहे. फोन किंवा स्काइपवर ती किमच्या संपर्कात असते. 

पॅरिस येथे काही बुरखाधारी चोरट्यांनी किमला हॉटेलच्या रूममध्ये बदुकीच्या धाकाने लुटले होते. तिच्याकडील कोट्यवधी डॉलर्सच्या किमतीचे दागिने त्यांनी लंपास केले होते. या घटनेनंतर किम प्रचंड दहशतीत आहे. तिला मानसिक आधार देण्याचे काम मॅडोना करीत आहे.  



गेल्या कित्येक वर्षांपासून दोघी एकमेकांच्या मैत्रिणी आहेत. मात्र किमसोबत झालेल्या घटनेनंतर त्यांच्यातील मैत्री आणखीच घट्ट झाली आहे. ‘क्लोजर’ साप्ताहिकाने दिलेल्या माहितीनुसार मॅडोनाला जाणीव आहे की, किमवर काय बेतली असेल. त्यामुळे तिला हिंमत देण्याची गरज आहे. तिच्या आयुष्यातील कटू प्रसंग विसरण्यासाठी तिला मदत करीत असल्याचे मॅडोना सांगते. 

दोघींमध्ये एकमेकींना समजून घेण्याप्रती समजूतदारपणा असल्याने ते बिनधास्तपणे एकमेकींना दु:ख शेअर करीत आहेत. संगीतकार कर्टनी लवदेखील किमला भावनिक आधार देत आहेत. तिने किमला एक पत्र लिहिले असून, हे चोरटे सापडल्यास त्यांना चांगला चोप देऊ, अशा धाडसी शब्दांचा प्रयोगही केला आहे. 

Web Title: Madonna's emotional support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.