जगाचा निरोप घेतल्यानंतरही 'या' सेलिब्रिटीची जादू कायम, मृत्यूनंतरही कमावतोय कोट्यवधी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:34 PM2019-12-03T17:34:44+5:302019-12-03T17:37:35+5:30

मृत्यूनंतरही दरमहा कोट्यवधी कमावणा-या सेलिब्रिटींची यादी फोर्ब्सनंकडून जाहीर करण्यात आली होती. यांत बड्या बड्या सेलिब्रिटींचा समावेश होता

Michal Jackson's Craze Remains Even After Death, Earning crores | जगाचा निरोप घेतल्यानंतरही 'या' सेलिब्रिटीची जादू कायम, मृत्यूनंतरही कमावतोय कोट्यवधी...

जगाचा निरोप घेतल्यानंतरही 'या' सेलिब्रिटीची जादू कायम, मृत्यूनंतरही कमावतोय कोट्यवधी...

googlenewsNext

रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. सेलिब्रिटींची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूनंतरही कमी होत नाही. अशीच काहीशी बाब समोर आली आहे. मृत्यूनंतरही दरमहा कोट्यवधी कमावणा-या सेलिब्रिटींची यादी फोर्ब्सनंकडून जाहीर करण्यात  आली  होती. यांत बड्या बड्या सेलिब्रिटींचा समावेश होता.  


या यादीत पॉप स्टार मायकल जॅक्सन अव्वल स्थानावर होता.किंग ऑफ पॉप नावाने प्रसिद्ध असलेल्या मायकलची लोकप्रियता त्याच्या मृत्यूनंतरही घटलेली नाही हेच यावरून स्पष्ट झाले होते. 2009 साली ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मायकलचा मृत्यू झाल्यानंतरही तो कोट्यवधीची कमाई करतो आहे. मायकल दरवर्षी 48 कोटी रुपये कमावत आहे. आजही, त्याच्या संगीत कंपनीत त्याची भागीदारी आहे आणि त्याच्या संगीताची रॉयल्टी वेगळी आहे. दोन वर्षापूर्वी  मायकलची कमाई साडेचारशे कोटी इतकी होती. 

या टॉप टेन यादीत अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नावही होते. ते अजूनही दरवर्षी 6 कोटी रुपयांची कमाई करतात. 62 वर्षांपूर्वी अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं निधन झालं. मात्र विज्ञानाच्या अनेक सिद्धांताचे परवाने आइन्स्टाईन यांच्या नावावर आहेत. त्याची रॉयल्टी त्यांना आजही मिळते. मायकल जॅक्सन, आईन्स्टाईन यांच्याशिवाय फोर्ब्सच्या या टॉप टेन यादीत बॉब मार्ले, जॉन लेनन, आर्नोल्ड पामर, आणि चार्ल्स शुल्ज यांचाही समावेश  होता.

Web Title: Michal Jackson's Craze Remains Even After Death, Earning crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.