Miss Universe 2019: अन् बिकिनी राऊंडमध्ये एकापाठोपाठ एक रॅम्पवर घसरून पडल्या स्पर्धक...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 01:07 PM2019-12-09T13:07:01+5:302019-12-09T13:07:56+5:30
‘मिस युनिव्हर्स 2019’च्या स्विमसूट राऊंडमध्ये असे काही झाले की, कुणी कल्पनाही करू शकणार नाही.
काल रविवारी अमेरिकेच्या अटलांटा येथे ‘मिस युनिव्हर्स 2019’चा रंगारंग सोहळा पार पडला. या स्पर्धेत 93 देशांतील सौंदर्यवतींनी भाग घेतला. या सौंदर्यवतींना टक्कर देत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने ‘मिस युनिव्हर्स 2019’च्या किताबावर आपले नाव कोरले. पण या सोहळ्याच्या स्विमसूट राऊंडमध्ये असे काही झाले की, त्याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही.
होय, स्विमसूट राऊंडदरम्यान मोठ्या तो-यात रॅम्पवर आलेल्या एका सौंदर्यवतीचा पाय घसरला आणि ती रॅम्पवरच खाली पडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मिस फ्रान्स माएवा कूच हिच्यासोबत ही घटना घडली. स्वत: माएवाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
स्विमसूट राऊंडमध्ये वॉक पूर्ण करत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. अर्थात खाली पडल्यानंतरही काही झालेच नाही, अशा आत्मविश्वासाने ती पुन्हा उभी झाली आणि परिक्षकांकडे हसत हसत माघारी परतली. पडल्यानंतरचा व्हिडीओ शेअर करताना, ‘पडल्यानंतर पुन्हा नव्या दमाने उभे राहणे, हेच महिलांच्या जीवनाचे सार आहे,’ असे माएवाने लिहिले.
विशेष म्हणजे, रॅम्पवर घसरणारी ती एकटी नव्हती. जवळजवळ सर्वच जणी एकाच जागी घसरून पडल्या. त्यामुळे हे जाणीवपूर्व केले गेले असावे, असा कयास बांधला जात आहे. आयोजकांचे मानाल तर, रॅम्पवर त्याठिकाणी काहीसा ओलावा असल्याने ही घटना घडली.