रस्त्यावर न्यूड फोटोशूट करणं या मॉडेलच्या आलं अंगाशी, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:29 PM2020-06-06T17:29:46+5:302020-06-06T17:30:21+5:30

ही मॉडेल बऱ्याचदा स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणी किंवा धार्मिक स्थळांवर न्यूड फोटोशूट केल्यामुळे वादात सापडली आहे.   

Model poses naked in front of stadium but faces fine for not wearing a mask | रस्त्यावर न्यूड फोटोशूट करणं या मॉडेलच्या आलं अंगाशी, कारण वाचून व्हाल हैराण

रस्त्यावर न्यूड फोटोशूट करणं या मॉडेलच्या आलं अंगाशी, कारण वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतासोबत अनेक देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. आता अनेक देशात लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. मात्र मास्क न वापरता न्यूड मॉडेल इवा मारियाला फोटोशूट करणे महागात पडले आहे.

लॉकडाउनमध्ये न्यूड मॉडेल इवा मारियाने फोटोशूट करायचे ठरवले. आजपर्यंत अनेकवेळा इवा नेहमी स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणी किंवा धार्मिक स्थळांवर 'न्यूड फोटोशूट्स' केल्यामुळे वादात सापडली आहे. यावेळी पण तिने लॉकडाऊनचे उल्लंघन करीत परवानगी न घेता प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियमसमोर न्यूड फोटोशूट केले. मात्र, पोलिसांनी तिने मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावला आहे.



सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मारिया न्यूड फोटोशूट करताना दिसत आहे. दरम्यान, पोलीस तिथे पोहोचले आणि मारिया आणि तिच्या फोटोग्राफरशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद होता मारियाने मास्क वापरला नाही म्हणून जेव्हा मारियाला फेस मास्क न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला. पोलिसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी पोलिसांना ट्रोल केले आहे.

मॉडेलवर मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यामुळे ३४७ रुबल दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी असे स्पष्ट केले आहे की न्यूड फोटोशूट काढणे हे गुन्हेगारीच्या प्रकारात नाही म्हणून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार नाही असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

Web Title: Model poses naked in front of stadium but faces fine for not wearing a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.