नेहाच्या ‘हेन सांग’ सिनेमाची आॅस्करवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 08:05 PM2016-11-03T20:05:04+5:302016-11-03T20:05:04+5:30

अभिनेत्री नेहा शर्मा हिचा पहिलाच आंतरराष्टय चित्रपट ‘हेन सांग’ आॅस्करसाठी निवडला गेला आहे. सर्वश्रेष्ठ विदेशी भाषा फिल्म या कॅटेगिरीत ...

Neha's 'Hen Sang' movie's Oscarwari | नेहाच्या ‘हेन सांग’ सिनेमाची आॅस्करवारी

नेहाच्या ‘हेन सांग’ सिनेमाची आॅस्करवारी

googlenewsNext
िनेत्री नेहा शर्मा हिचा पहिलाच आंतरराष्टय चित्रपट ‘हेन सांग’ आॅस्करसाठी निवडला गेला आहे. सर्वश्रेष्ठ विदेशी भाषा फिल्म या कॅटेगिरीत या चित्रपटाची चीनच्या एंट्रीत निवड करण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हुओ जिआनछी आणि निर्मिती वोंक कार-वाई यांनी केले आहे. 
हा चित्रपट सातव्या शतकातील बौद्ध भिक्षु यांच्या चीन ते भारत या ऐतिहासिक प्रवासावर आधारित आहे. चीनी अभिनेता हुआंग शियाओमिंग याने बौद्ध भिक्षु यांची भूमिका साकारली असून, या बौद्ध भिक्षुला त्याचा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल १७ वर्ष लागले होते. 
दरम्यान नेहाच्या चित्रपटाची निवड थेट आॅस्करसाठी करण्यात आल्याने ती प्रचंड खुश आहे. चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सोन सूद आणि अली फजल यांच्यासह अन्य भारतीय कलाकार देखील आहेत. याविषयी नेहाने सांगितले की, मला आताच ट्विटरवरून कळाले की, चीनकडून ‘हेन सांग’ हा चित्रपट आॅस्करसाठी निवडला गेला आहे. ही बातमी नक्कीच आनंदाची असून, तो कसा व्यक्त करावा यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. चित्रपटादरम्यानचा अनुभव खूपच प्रभावित करणारा होता. चीनने आॅस्करसाठी सर्वश्रेष्ठ विदेशी भाषा या कॅटेगिरीत या चित्रपटाची निवड केली आहे. 

Web Title: Neha's 'Hen Sang' movie's Oscarwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.