'देसी गर्ल' प्रियांकाचा पती निक गंभीर आजाराशी देतोय लढा, पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 17:10 IST2025-04-22T17:09:43+5:302025-04-22T17:10:04+5:30

निक जोनसने गंभीर आजाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

Nick Jonas Opens Up On Diabetes Diagnosis At 13 Share Post Priyanka Chopra Sends Love | 'देसी गर्ल' प्रियांकाचा पती निक गंभीर आजाराशी देतोय लढा, पोस्ट शेअर करत दिली माहिती

'देसी गर्ल' प्रियांकाचा पती निक गंभीर आजाराशी देतोय लढा, पोस्ट शेअर करत दिली माहिती

Nick Jonas: 'ग्लोबल आयकॉन' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक  जोनास (Nick Jonas ) या दोघांची जोडी खूप क्यूट आहे. ते चाहत्यांना कायम कपल गोल्स देत असतात.  या जोडीचे वैयक्तिक आयुष्य नेहमी चर्चेत असतं. नुकतंच निक जोनसने गंभीर आजाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.  निक गेल्या अनेक वर्षापासून गंभीर आजाराला लढा देतोय. 

प्रियंकाचा पती निकला १३ वर्षांचा असतानाच मधुमेहाचे निदान झालं होतं.  तेव्हापासून तो मधुमेहाशी लढा देत आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं लिहलं, "१३ व्या वर्षी टाइप १  मधुमेहाचे निदान झाल्यानंतर असं वाटलं होतं की कोणीतरी माझ्या स्वप्नांचे दार बंद केलंय. पण, आता, ब्रॉडवे स्टेजवर परत येताना बालपणीच्या निकला परत जाऊन सांगायची इच्छा आहे की,  कल्पना करू शकत नाही, त्यापेक्षा चांगलं झालं आहे". 

यासोबतच निकने या पोस्टमध्ये रक्तातील साखरेची पातळीचे निरिक्षण नोंदवण्यात मदत करणाऱ्या उपकरणाविषयी सांगितलं. तसेच लेक मालतीला आजाराबाबत संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितल्याचं निक म्हणाला. पोस्टमध्ये निकने सांगितलं की, "एकदा मुलगी घरी असताना अनेक दिवसांनी माझ्या रक्तातील साखर कमी झाली होती. दुसरीकडे, तिला एक बाटली हवी होती किंवा मी तिच्याकडे लक्ष देण्याची गरज होती. तो एक नवीन अनुभव होता. कुटुंबामध्ये असे संभाषण सामान्य झाले पाहिजे कारण त्यानंतर अद्भुत वाटतं".  निकने शेअर केलेल्या पोस्टवर प्रियांकानेही इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

मधुमेह किंवा डायबिटीस हा आयुष्यभर सोबत राहणारा आजार किंवा आरोग्य विषयक समस्या आहे. दरवर्षी सुमारे 10 लाखांहून अधिक लोकांचा यामुळं मृत्यू होतो. हा आजार अगदी कोणालाही होऊ शकतो. मधुमेहामुळं अंधत्व, किडणी निकामी होणे, हार्ट अटॅक, पक्षाघात आणि शरिराच्या खालच्या भागातील अवयवांच्या विच्छेदनासाठी मधुमेह हे प्रमुख कारण असल्याचं WHO चं म्हणणं आहे.

निक जोनक आणि प्रियंका चोप्रा यांचं २०१८ मध्ये लग्न झालं होतं दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. निक आणि प्रियंका यांनी ख्रिश्चन आणि हिंदू पद्धतीत लग्न केलं होतं. लग्नानंतर अभिनेत्रीने सेरोगसीच्या मदतीने लेक मालती हिचं स्वागत केलं. प्रियांका कायम लेकीसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

Web Title: Nick Jonas Opens Up On Diabetes Diagnosis At 13 Share Post Priyanka Chopra Sends Love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.