भर कार्यक्रमात प्रियंका चोप्रासोबत रोमाँटिक झाला निक जोनास, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 20:18 IST2023-09-17T20:17:19+5:302023-09-17T20:18:22+5:30
सध्या एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये निक आणि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

Priyanka Chopra - Nick Jones
हॉलिवूड सिंगर, गायक व प्रियंकाचा पती निक जोनसने 16 सप्टेंबरला त्याचा 31 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या एका दिवसानंतर सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये निक आणि प्रियांका एकमेकांना किस करताना दिसत आहेत.
निक जोनासच्या वाढदिवसानिमित्त जोनास ब्रदर्सचा कॉन्सर्ट अमेरिकेतील ओमाहा येथे झाला. यावेळी चर्चा राहिली ती प्रियंका आणि निकच्या केमिस्ट्रीची. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना निक जोनासप्रियंका चोप्राजवळ पोहचला. यानंतर जेव्हा प्रियंकाला त्याने किस केले. यावेळी प्रियांका पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. दोघांच्या केमिस्ट्रीने लोकांची मनं जिंकली आहेत.
निक जोनास व प्रियंका चोप्रा डिसेंबर, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. निक आणि प्रियांका यांच्या वयात तब्बल ११ वर्षांचे अंतर आहे. बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनेकदा चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सिटाडेल या चित्रपटात दिसणार आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर प्रियांका 'जी ले जरा' या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट आणि कतरिना कैफसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.