नोबेल पुरस्कारावर बॉब डिलेन यांची नाराजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2016 04:06 PM2016-10-20T16:06:43+5:302016-10-20T16:06:43+5:30

साहित्य क्षेत्रासाठी यावर्षीचा नोबेल पुरस्कार बॉब डिलेन यांना घोषित करण्यात आला. पुरस्काराची घोषणा करून जवळपास एक आठवडा झाला. मात्र, ...

Nobel prize annoyed Bob Dylan? | नोबेल पुरस्कारावर बॉब डिलेन यांची नाराजी?

नोबेल पुरस्कारावर बॉब डिलेन यांची नाराजी?

googlenewsNext
हित्य क्षेत्रासाठी यावर्षीचा नोबेल पुरस्कार बॉब डिलेन यांना घोषित करण्यात आला. पुरस्काराची घोषणा करून जवळपास एक आठवडा झाला. मात्र, बॉब डिलेन यांनी अद्यापपर्यंत यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नसल्याने पुरस्कार समारंभात त्यांच्या उपस्थितीबाबत शंका निर्माण झालीय. 
स्वीडिश अकादमीचे प्रशासकीय अधिकारी आॅड स्कीडरिक यांनी मंगळवारी एका चॅनेल दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, आम्ही त्यांना संपर्क करण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचे मॅनेजर तथा मित्र परिवाराशी संपर्क केला, परंतू कोणाकडूनही आम्हाला योग्य ती प्रतिक्रिया मिळाली नाही. त्यामुळे आता आम्ही त्यांना संपर्क करणे बंद केले आहे. मात्र, ठरल्याप्रमाणे त्यांना पुरस्कार दिला जाईल, ते समारंभात उपस्थित राहो अथवा न राहो. आम्ही केवळ त्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत आहोत. 
समाचार एजेंसी सिन्हुआ यांच्या रिपोर्टनुसार, स्वीडिश अकादमीचे सचिव सारा डेनियसने गेल्या सोमवारी सांगितले की, या विषयावर सध्या आम्ही प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. आम्ही त्यांच्या सर्वात जवळ असलेल्या एका व्यक्तीला ई-मेलद्वारे संपर्क साधला. त्यावर आम्हाला चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे.  बॉब डिलेन यांनी अद्यापपर्यंत यावर प्रतिक्रिया दिली नसल्याने डिसेंबरमध्ये होणाºया पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्या उपस्थितीबाबत शंका आहे. 
डेनियस म्हणाले, ठरल्याप्रमाणे पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. आम्ही पुरस्काराचे वितरण करणार आहोत. त्यांचा यथोचित सन्मान करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.  बॉब डिलेन यांनी या विषयावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नसल्याने विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.

Web Title: Nobel prize annoyed Bob Dylan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.