...आता डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात प्रियंका चोपडाही उतरली मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2017 08:29 AM2017-02-04T08:29:27+5:302017-02-04T14:00:06+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. टॉप अ‍ॅक्ट्रेस जेनिफर लॉरेंस, एश्टन कटशर, अ‍ॅँजेलिना जोली, जॉन लेजेंड ...

... Now Priyanka Chopra also came out against Donald Trump on the field | ...आता डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात प्रियंका चोपडाही उतरली मैदानात

...आता डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात प्रियंका चोपडाही उतरली मैदानात

googlenewsNext
ेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दिवसेंदिवस विरोध वाढत आहे. टॉप अ‍ॅक्ट्रेस जेनिफर लॉरेंस, एश्टन कटशर, अ‍ॅँजेलिना जोली, जॉन लेजेंड यांच्यासह मेरिल स्ट्रीप हिनेही गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये रोखठोक भाषण देत ट्रम्प यांचा जाहीरपणे विरोध केला होता. आता या यादीत बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडा हिचाही समावेश झाला आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच इमिग्रेशनवर अस्थायी स्वरूपात बॅन लावल्याचा निर्णय घेतल्याने प्रियंकाने या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

प्रियंकाने म्हटले की, हा निर्णय खूपच निराशाजनक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या शुक्र्रवारी एका शासकीय आदेशावर हस्ताक्षर करताना शरणार्थींना अमेरिकेत १२० दिवसांसाठी प्रवेश करण्यास प्रतिबंध लावले होते. त्याचबरोबर सिरियाई शरणार्थींच्या प्रवेशावर अनिश्चितकाळासाठी प्रतिबंध लावले. यामुळे मुस्लीमबहुल इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि यमन येथून येणाºया नागरिकांना अमेरिकेत ९० दिवसांसाठीचा प्रवेश वर्जित केला गेला. 



डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानंतर प्रियंकाने लगेचच लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या भावनिक पोस्टमध्ये प्रियंकाने लिहिले की, एक वैश्विक नागरिक म्हणून मला हा निर्णय खूपच निराशादायी वाटतो. कारण सर्व प्रतिबंधित देश अशा ठिकाणी आहेत, जेथे यूनिसेफचे प्रचंड काम सुरू आहे. या भागात सर्वाधिक हालअपेष्टा लहान मुले सहन करीत आहेत. यूएस असा देश मानला जातो जो अप्रवासींंच्या वास्तव्याने तयार झालेला आहे. त्यामुळे अमेरिकी स्टेट डिपार्टमेंटनी लावलेला ९० दिवसांचा बॅन चीड आणि लाचारी पत्करण्यासारखा वाटत असल्याचे प्रियंकाने पोस्टमध्ये लिहले. 

तसेच पोस्टमध्ये पुढे म्हटले की, काय आपण उद्याची हेडलाइंस बदलू शकतो? कारण आपल्याला असे जग घडवायचे आहे, ज्याठिकाणी लहान मुलांना पूर्णत: संरक्षण मिळू शकेल. यावेळी प्रियंकाने इतरांनाही या निर्णयाविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे. प्रियंकाच्या या भावनिक पोस्टनंतर हॉलिवूड आयकॉन अ‍ॅँजेलिना जोली हिनेही ट्रम्प यांच्यावर टीका करीत म्हटले की, शरणार्थींसाठी अमेरिकेचे दरवाजे बंद करून किंवा त्यांच्याशी भेदभाव करून अमेरिका सुरक्षित बनणार नाही. 

२०१२ पासून संयुक्त राष्टÑाची उच्चायुक्त म्हणून अ‍ॅँजेलिना जोली काम करीत आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या संपादकीयमध्ये लिहताना अ‍ॅँजेलिनाने म्हटले की, शरणार्थींबाबतचे निर्णय हे वास्तविक असायला हवेत, भीतीपोटी नव्हे. कारण शरणार्थींमध्ये पुरुष, महिला आणि लहान मुले युद्धजन्य स्थितीत अडकलेले आहेत. शिवाय ते सर्व लोक दहशतवादाने ग्रस्त आहेत. ट्रम्प यांचे नाव न घेताच अ‍ॅँजेलिनाने म्हटले की, या निर्णयामुळे जगभरातील अमेरिकेच्या मित्रराष्टÑांना हादरा बसला आहे. प्रियंका आणि अ‍ॅँजेलिनानंतर आणखीही बरेचसे स्टार्स ट्रम्पच्या विरोधात पुन्हा उभे राहिले आहेत. 

Web Title: ... Now Priyanka Chopra also came out against Donald Trump on the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.