नन या चित्रपटाने जगभरात जमवला इतक्या कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 01:04 PM2018-09-26T13:04:45+5:302018-09-27T06:30:00+5:30
नन हा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन आठवडे झाले असून हा चित्रपट सगळीकडेच गाजत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.
‘द नन’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या हॉरर चित्रपटाची गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षक वाट पाहात होते. दैवी शक्ती, भुताटकी, भूत, अक्राळविक्राळ चेहऱ्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे सद्या चांगलेच प्रेम मिळत आहे. ‘द नन’ हा चित्रपट नुकताच जगभरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन आठवडे झाले असून हा चित्रपट सगळीकडेच गाजत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.
कॉन्ज्युरिंग हा हॉलिवूडचा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट हॉलिवूडमधील सर्वात भयानक चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. याच चित्रपटाचा द नन हा प्रिक्वल आहे. ‘कॉन्ज्युरिंग’ सीरिजमधला हा सर्वांत यशस्वी चित्रपट असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. तीन आठवड्यांमध्ये या थरारपटाने सुमारे १४०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतात देखील या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. भारतात पहिल्याच तीन दिवसांत या चित्रपटाने 30 कोटींहून अधिक पैसे कमावले आहेत.
‘द नन’चे कथानक आजच्या काळातील नव्हे तर १९५२ सालातील आहे. सेंट कार्टा स्थित ऐबीमधील एका चर्चामधील नन अचानक आत्महत्या करते. या आत्महत्येचे गूढ उकलण्यासाठी तीन जण ऐबीमध्ये पोहोचतात. ननची आत्महत्या आणि त्यानंतर घडणाऱ्या गोष्टी यावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. या ऐबीमध्ये म्हणजेच जिथे नन राहत असतात तिथे हे तिघे
पोहोचल्यानंतर अनेक अप्रिय घटना घडतात. या ऐबीचं नक्की रहस्य काय आहे... त्या ननने आत्महत्या का केलेली असते... यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ‘द नन’ या चित्रपटात प्रेक्षकांना मिळतात. ‘काँज्युरिंग’ सिरिजमधल्या आधीच्या सगळ्याच चित्रपटाांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘द नन’ कडेही मोठा प्रेक्षकवर्ग आकर्षित होत आहे. भविष्यात हा चित्रपट जगभरात 1500 हून अधिक कोटींचा गल्ला जमवेल अशी आशा वर्तवली जात आहे.