... तरच स्कार्लेट जॉन्सन देणार डोनाल्ड ट्रम्पला समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2017 04:38 PM2017-01-24T16:38:53+5:302017-01-24T22:16:40+5:30

सध्या हॉलिवूड कलाकारांकडून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जणू काही युद्धच छेडले आहे. रोज एकतरी स्टार त्यांच्याविरोधात वक्तव्य करून ...

... Only then Scarlett Johnson will support Donald Trumple | ... तरच स्कार्लेट जॉन्सन देणार डोनाल्ड ट्रम्पला समर्थन

... तरच स्कार्लेट जॉन्सन देणार डोनाल्ड ट्रम्पला समर्थन

googlenewsNext
्या हॉलिवूड कलाकारांकडून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात जणू काही युद्धच छेडले आहे. रोज एकतरी स्टार त्यांच्याविरोधात वक्तव्य करून त्यांचा विरोध दर्शवित आहे. आता या यादीत अमेरिकी अभिनेत्री स्कार्लेट जॉन्सन हिचे नाव जोडले गेले आहे; मात्र तिने विरोध न करता ट्रम्प यांच्यासमोर काही अटी ठेवल्या आहेत. अर्थात त्या अटी महिलांविषयी असून, त्या ट्रम्प यांनी मान्य केल्यास त्यांना समर्थन देणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. 



स्कार्लेट जॉन्सनने नुकतेच महिलांच्या आरोग्याविषयी एक जोरदार भाषण दिले आहे. या भाषणामध्ये तिने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अपील केले की, जर ते तिचा, तिच्या मुलीच्या परिवाराचा आणि सर्व अमेरिकी महिलांचा आदर आणि सहकार्य करीत असतील तरच त्यांना समर्थन दिले जाईल. लॉस एंजेलिस टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ३२ वर्षीय स्कार्लेटने तिच्या जीवनातील प्लान्ड पॅरेंटहूडच्या भूमिकेविषयी एक जबरदस्त भाषण दिले आहे. प्लान्ड पॅरेंटहूड एक संस्था असून, लैगिंक शिक्षण आणि प्रसूतीसंबंधी आरोग्य सेवा देण्याचे काम करते.  

स्कार्लेटने म्हटले की, तुम्ही कधी स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेला आहात काय? हा प्रश्न माझ्या आईने मला तेव्हा विचारला होता, जेव्हा मी १५ वर्षांची होते. तेव्हा मी तिला माझ्या शरीरात झालेल्या बदलाविषयीची माहिती दिली होती. होय, मी १५ वर्षांची असतानाच स्त्रीरोग तज्ज्ञांकडे गेली होती. मी तेव्हा न्यूयॉर्कला राहत होते. तेव्हा मी पहिल्यांदाच प्लान्ड पॅरेंटहूड यांच्या संपर्कात आली. त्याठिकाणी गेल्यानंतर मला असे लक्षात आले की, हे ठिकाण सुरक्षित असून, येथे योग्य मार्गदर्शन मिळू शकते. अन् याच संस्थेला संलग्न असलेल्या महिलांना ट्रम्प यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे ती म्हणाली. 



स्कार्लेटने ट्रम्प यांना अपील करताना म्हटले की, मी तुम्हाला माझे मत दिले नाही. पण तरीदेखील मी तुमच्या राष्ट्राध्यक्षपदाचा सन्मान करतेय. मला तुम्हाला समर्थन द्यायचे आहे परंतु त्या अगोदर तुम्हाला मला, माझ्या बहिणीला, आईला, मैत्रिणींना आणि समस्त स्त्रियांना समर्थन द्यावे लागेल. आम्ही सर्व तुमच्या पुढच्या धोरणाविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहोत. तुमचे धोरण आमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यास फायदेशीर ठरेल, अशी आम्ही अपेक्षा करीत आहोत. 

तसेच स्कार्लेटने म्हटले की, माझ्या मुलीचे समर्थन करा, कारण ती अशा देशात लहानाची मोठी होत आहे, ज्याठिकाणी तिला तिचे भविष्य घडविण्याचा अधिकार नाही, जो तुमची मुलगी इवांकाकडे आहे. स्कार्लेटच्या या भाषणानंतर उपस्थितांनी तिचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करीत तिचे समर्थन केले.

Web Title: ... Only then Scarlett Johnson will support Donald Trumple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.