Oscars 2021: फक्त काहीच तासांची प्रतीक्षा...; जाणून घ्या भारतात कुठे व कधी पाहाल सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 01:36 PM2021-04-25T13:36:36+5:302021-04-25T13:38:53+5:30
जगभरातील चित्रपट प्रेमी ज्या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात तो, अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2021 (Oscars 2021) काही तासांवर येऊन ठेपला आहे.
जगभरातील चित्रपट प्रेमी ज्या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात तो, क्षण काही तासांवर येऊन ठेपला आहे. होय, आज म्हणजे 25 एप्रिल 2021 रोजी ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा होणार आहे. भारतीय प्रेक्षक 26 एप्रिल रोजी पहाटे 5.30 ते 8.30 यावेळेत हा सोहळा पाहू शकतात. (Oscars 2021 )
कोरोना महामारीमुळे यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्याला विलंब झाला. मात्र आता अवघ्या काही तासांत हा सोहळा सुरु होतोय. (93rd academy awards)
प्रियंका चोप्रा आणि तिचा पती संगीतकार निक जोनास यांनी 93 व्या अकादमी पुरस्कारासाठी 15 मार्च रोजी लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे 23 श्रेणीसाठी नामांकने जाहीर केली होती. तुम्ही ऑस्करच्या Oscar.com या अधिकृत संकेतस्थळांवर संपूर्ण नामांकने पाहू शकता. तसेच ऑस्करच्या सोशल मीडिया हँडल्सवरही याची संपूर्ण यादी उपलब्ध आहे.
सध्याची कोरोना विषाणूची परिस्थिती पाहता, सामाजिक अंतरांच्या निकषांचे पालन करत ऑस्करर 2021चे थेट प्रक्षेपण होणार आहे. आपण Oscar.com वर किंवा त्यांच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पाहू शकता. सोशल मीडिया हँडल्सवरही हा सोहळा पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
ऑस्कर पुरस्कार हा सिनेमा जगतातील सर्वांत मोठा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर नामांकनांच्या यादीमध्ये स्थान मिळावे यासाठी तसेच पुरस्कारासाठीच्या शर्यतीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे यासाठी जगभरातील फिल्म मेकर्स खूप प्रयत्न करतात.
म्हणून आहे खास
यंदाचा ऑस्कर सोहळा अनेकार्थाने खास आहे. कारण काय तर यंदा Chloe Zhao ही पहिली आशियाई महिला बेस्ट डायरेक्टरसाठी नॉमिनेट झाली आहे. ‘नोमाडलँड’ या सिनेमासाठी तिला नामांकन मिळाले आहे.
फिचर फिल्म डेब्यू बेस्ट डायरेक्टर या श्रेणीतही पहिल्यांदा एका महिलेला नामांकन मिळाले आहे. या श्रेणीत हिला नामांकन मिळाले आहे.
एकाच वर्षी दिग्दर्शनासाठी दोन महिलांना नामांकन मिळण्याची ऑस्कररच्या इतिहासातील ही पहिली वेळ आहे. यंदाच्या सोहळ्यात सर्व श्रेणीमध्ये 76 महिलांना वेगवेगळ्या श्रेणीत नामांकने मिळाली आहेत. हा एक विक्रमी आकडा आहे.
हा पुरस्कार यावेळी इतिहास घडवणार आहे, कारण प्रथमच ऑस्करमधील मुख्य अभिनेत्याच्या श्रेणीत एका मुस्लिम अभिनेत्याला नामांकन देण्यात आले आहे. रिज अहमद (Actor Riz Ahmed) हा अभिनेता चित्रपट ‘साऊंड ऑफ मेटल’साठी (Sound Of Metal) या वर्षीचा बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोल विभागात नामांकित झाला आहे. रिज अहमद हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश अभिनेता आहे
मिनारी या सिनेमासाठी Youn Yuh-jung या दक्षिण कोरियाच्या अभिनेत्रीला ऑस्कर नामांकन मिळाले आहे. ती ऑस्कर नामांकन मिळणारी दक्षिण कोरियाची पहिली अभिनेत्री आहे.