Oscars 2022: ऑस्करची ट्रॉफी खरंच सोन्याची असते? किंमत ऐकूल व्हाल अवाक्; पाहा, खर्च अन् वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 09:46 AM2022-03-28T09:46:55+5:302022-03-28T09:48:28+5:30

Oscars 2022: ऑस्कर पुरस्कार विजेत्याला मिळालेली ट्रॉफी विकताही येते, पण...

oscar 2022 is the oscar trophy really made of gold know about all details with price | Oscars 2022: ऑस्करची ट्रॉफी खरंच सोन्याची असते? किंमत ऐकूल व्हाल अवाक्; पाहा, खर्च अन् वैशिष्ट्ये

Oscars 2022: ऑस्करची ट्रॉफी खरंच सोन्याची असते? किंमत ऐकूल व्हाल अवाक्; पाहा, खर्च अन् वैशिष्ट्ये

googlenewsNext

कलाविश्वातील सर्वाधिक महत्त्वाचा आणि मानाचा मानला गेलेला पुरस्कार म्हणजे ऑस्कर. गेल्या सुमारे ९० हून जास्त वर्षांपासून ऑस्कर पुरस्कार दिला जात आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकाराला एकदा तरी ऑस्करचे स्वप्न पडल्याशिवाय राहात नाही. मात्र, ते सत्यात उतरणे अतिशय कठीण असल्याचे सांगितले जाते. एकाहून एक दर्जेदार चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत असतात. ऑस्कर पुरस्काराची ट्रॉफी अत्यंत आकर्षक असते. ती खरच सोन्याची असते का, ट्रॉफी बनवण्यासाठी किती खर्च येतो, ते जाणून घेऊया...

मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्करमध्ये एखाद्या चित्रपटात एण्ट्री मिळवण्यासाठी ३० लाखांपासून कोट्यवधींपर्यंतचा खर्च येऊ शकतो. चित्रपटाच्या प्रवेशानंतर अनेक ठिकाणी पैसा खर्च करावा लागतो. त्या चित्रपटाचे प्रमोशन करणे, चित्रपट पाहण्यासाठी लोकांना पटवून देणे, यांसह विविध बाबीसाठी कोट्यवधींचा खर्च येतो. ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या विजेत्या कलाकारांचे मानधन तीन ते चार पटीने वाढते. त्यांच्या मानधनात जवळपास ८१ टक्क्यांनी वाढ होते, असे सांगितले जाते. 

ऑस्करची ट्रॉफी खरंच सोन्याची असते का?

ऑस्कर पुरस्कारात मिळणारी सोनेरी बाहुली म्हणजे ट्रॉफी ही सोन्याची असते का? असा प्रश्न अनेकांना पडतो. ऑस्करची ट्रॉफी तांब्याची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा मुलामा लावला जातो. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस धातूच्या कमतरतेमुळे तीन वर्ष ऑस्कर ट्रॉफी रंग लावलेल्या प्लॅस्टरमध्ये तयार करण्यात आली होती. ऑस्कर पुरस्कारावर अब्जावधी रुपये खर्च केले जातात. या ट्रॉफीची किंमत त्यावेळीच्या तांबे आणि सोन्याच्या किंमतीवर अवलंबून असते. दरवर्षी या एका ट्रॉफीची निर्मिती करण्यासाठी ४०० डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास ३१ हजार रुपये खर्च येतो, असे म्हटले जाते. 

ऑस्कर विजेत्यांना ही ट्रॉफी विकता येते का?

अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नियमानुसार, कोणत्याही विजेत्याचा ऑस्कर ट्रॉफीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नसतो. त्यामुळे विजेत्याची इच्छा असली तरी तो ही ऑस्कर ट्रॉफी विकू शकत नाही. जर विजेत्याला ती ट्रॉफी विकायची असेल तर त्याला सर्वात आधी ती अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सला विकावी लागते. विशेष म्हणजे ही अकादमी फक्त १ डॉलरला ऑस्कर ट्रॉफी विकत घेते.
 

Web Title: oscar 2022 is the oscar trophy really made of gold know about all details with price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर