विकास साठ्ये या मराठमोळ्या अभियंत्याने पटकावला ऑस्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 11:33 AM2018-02-12T11:33:22+5:302018-02-12T17:03:22+5:30

ऑस्कर हा जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जातो. बॉलिवूडच्या चित्रपटाने ऑस्कर जिंकावा अशी बॉलिवूड चित्रपटाच्या सगळ्याच फॅन्सची इच्छा असते. ...

Oscar nominated by the Maratha Engineer | विकास साठ्ये या मराठमोळ्या अभियंत्याने पटकावला ऑस्कर

विकास साठ्ये या मराठमोळ्या अभियंत्याने पटकावला ऑस्कर

googlenewsNext
्कर हा जगातील सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जातो. बॉलिवूडच्या चित्रपटाने ऑस्कर जिंकावा अशी बॉलिवूड चित्रपटाच्या सगळ्याच फॅन्सची इच्छा असते. बॉलिवूडप्रमाणेच मराठी चित्रपट देखील प्रेक्षकांचे मन जिंकू लागले आहेत. त्यामुळे आपल्या मराठी चित्रपटाने देखील ऑस्कर पर्यंत मजल मारावी अशी अनेकांची इच्छा आहे. पण आजपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटाला ऑस्कर पर्यंत मजल मारता आली नाहीये. पण एका मराठी माणसाने ऑस्करचा पुरस्कार पटकावला असून या पुरस्काराची सध्या चांगलीच चर्चा आहे.
विकास साठ्ये असे या मराठी माणसाचे नाव असून मुंबईच्या या अभियंत्याने तांत्रिक विभागांसाठी देण्यात येणाऱ्या ऑस्कर वर आपले नाव कोरले आहे. विकास साठ्ये हे मुळचे पुण्याचे आहेत. त्यांचा जन्म पुण्यातला असला तरी ते मुंबईतच लहानाचे मोठे झाले. ठाण्याच्या व्ही.पी.एम. पॉलिटेक्निकमधून त्यांनी इन्स्ट्रूमेंटेशनचा डिप्लोमा केला. पुढे पुण्याच्या व्हीआयटीमधून इलेक्ट्रॉनिक्समधून बीई आणि IISc मधून इन्स्ट्रूमेंटेशन विषयातून एम.टेक्. केले. त्यांनंतर पुण्याच्या क्युमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग या कॉलेजमध्ये सात वर्षं प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी केली. कॅलिफोर्नियातील बेव्हर्ली हिल्स येथे सायंटिफिक अँड टेक्निकल ऑस्कर २०१८ ऑस्कर सोहळा नुकता पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात कॅमेरा तंत्र पुरस्कारामध्ये चार जणांची निवड झाली. 'शॉटोव्हर K1 कॅमेरा सिस्टीम' तंत्राचा सिनेमात यशस्वी वापर केल्याबद्दल या चौघांना ऑस्कर मिळाले आहे. या चौघांपैकी एक विकास साठ्ये आहेत. त्यांनी हे कॅमेरा तंत्र विकसित केले आहे. हा पुरस्कार स्वीकारताना साठ्ये म्हणाले, '२००९ मध्ये मी न्यूझिलंडमधील क्वीनस्टोन भागातली शॉटोव्हर कॅमेरा सिस्टीम या कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्यात एरिअल माउंट प्रकारावर काम केले. क्वीनस्टोनचे निसर्गसौंदर्य अनेक सिनेनिर्मात्यांना-दिग्दर्शकांना भुरळ पाडते. त्यामुळेच ही कंपनी तिथे सुरू करण्यात आली होती. हेलिकॉप्टरच्या खालच्या भागात हा कॅमेरा बसवला जातो. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा ऑपरेटरशिवाय हव्या त्या अँगलला वळवता येतो. हेलिकॉप्टरमध्ये बसलेला ऑपरेटर जॉयस्टिकद्वारे कॅमेऱ्यावर नियंत्रण ठेवतो. अशा पद्धतीने थ्री डी एरिअल फिल्मिंग या कॅमेऱ्याद्वारे यशस्वीपणे करता येते.

Web Title: Oscar nominated by the Maratha Engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.