Oscars 2018 : आॅस्कर सोहळ्यात ‘या’ चार लेडी स्टारला दिला जाणार विशेष सन्मान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 11:24 AM2018-03-04T11:24:24+5:302018-03-04T16:54:40+5:30

९०व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा महिलांचा बोलबाला असणार आहे. अकॅडमी आॅफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायंसेजने यावेळी चार महिला ...

Oscars 2018: Special honor to be given to four 'Lady Star' at the Oscars | Oscars 2018 : आॅस्कर सोहळ्यात ‘या’ चार लेडी स्टारला दिला जाणार विशेष सन्मान!

Oscars 2018 : आॅस्कर सोहळ्यात ‘या’ चार लेडी स्टारला दिला जाणार विशेष सन्मान!

googlenewsNext
व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा महिलांचा बोलबाला असणार आहे. अकॅडमी आॅफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायंसेजने यावेळी चार महिला अभिनेत्रींची निवड केली आहे. या चारही अभिनेत्री ९० व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वश्रेष्ठ अभिनेत्री आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्याला विजयी ट्राफी देणार आहेत. वेरायटी डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जेनिफर लॉरेन्स आणि जोडी फोस्टर सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीच्या नावाची घोषणा करणार आहेत. तर जेन फोंडा आणि हेलेन मिरेन सर्वश्रेष्ठ अभिनेत्याला पुरस्कार ट्रॉफी देणार आहेत. 

ALSO READ : या चित्रपटांना मिळाले आॅस्करसाठी नॉमिनेशन, वाचा संपूर्ण यादी!

असे म्हटले जात आहे की, अशाप्रकारे महिला अभिनेत्रींना संधी देण्यामागे हॅशटॅगमीटू आणि टाइम्स अप या अभियानचा संबंध आहे. हे दोन्ही अभियान लैंगिक शोषणाविरोधात सुरू करण्यात आले आहे. हॉलिवूड निर्माता हार्वी वायनस्टीन याच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर जगभरात हे दोन्ही अभियान राबविले जात आहे. या अभियानाचा प्रभाव बॉलिवूडमध्येही बघावयास मिळत असून, अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाची जाहीरपणे वाच्यता केली आहे. 

ALSO READ : आॅस्कर सोहळ्यापूर्वीच हार्वी विनस्टीनची ‘ती’ असूरी प्रतिकृती चर्चेत!

सध्या आॅस्कर सोहळ्याची धूम असून, आज सायंकाळी त्याचा जल्लोष बघावयास मिळणार आहे. काही वेळापूर्वीच आम्ही आॅस्करमध्ये नॉमिनेशन मिळालेल्या चित्रपटांची यादी अपलोड केली होती. या सोहळ्याशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत. 

Web Title: Oscars 2018: Special honor to be given to four 'Lady Star' at the Oscars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.