Oscars 2018 : ९० व्या आॅस्कर पुरस्कार सोहळ्यास प्रारंभ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 02:44 PM2018-03-04T14:44:16+5:302018-03-04T21:25:08+5:30
हॉलिवूडच्या सर्वांत मोठ्या अवॉर्ड नाइटची तयारी पूर्ण झाली आहे. ९०व्या अकॅडमी अवॉर्डचे आज रात्री आयोजन करण्यात आले असून, जगभरातील ...
ह लिवूडच्या सर्वांत मोठ्या अवॉर्ड नाइटची तयारी पूर्ण झाली आहे. ९०व्या अकॅडमी अवॉर्डचे आज रात्री आयोजन करण्यात आले असून, जगभरातील दिग्दर्शक आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांसोबत याठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. याठिकाणी चित्रपट जगतातील सर्वोत्कृष्ट कलाकारांचा आणि त्यांनी सादर केलेल्या कलाकृतीचा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकदेखील हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत की, यंदाच्या आॅस्करवर कोणाचे नाव कोरले जाणार आहे.
हा सोहळा अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. अमेरिकेत एबीसी या वाहिनीवर हा सोहळा रात्री ८ वाजेपासून प्रसारित केला जाणार आहे, तर भारतात सोमवारी सकाळी ५.३० वाजता प्रसारित केला जाणार आहे. तुम्ही तुमचा आवडता अवॉर्ड सोहळा मिस करू नये म्हणूनच आम्ही तुम्हाला या सोहळ्याच्या प्रसारणाविषयीची माहिती देत आहोत. हा सोहळा स्टार मुव्हीज, स्टार मुव्हीज एचडी, स्टार मुव्हीज प्रीमियर एचडी आदी वाहिन्यांवर प्रसारित केला जाणार आहे.
दरम्यान, ९०व्या अकॅडमी सोहळ्यास जिम्मी किम्मेल होस्ट करताना बघावयास मिळणार आहे. रेड कार्पेट इव्हेंट शो सुरू होऊन जवळपास एक तास झाला असून, अनेक कलाकारांनी आपल्या दिलखेच अदा दाखविल्या आहेत. या सोहळ्याशी संबंधित इत्यंभुत बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत.