Oscars 2020 च्या नामांकनात ‘जोकर’चा दबदबा, पाहा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:32 AM2020-01-14T10:32:27+5:302020-01-14T10:34:10+5:30

Oscars 2020 : 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कारांची  नामांकने जाहीर झाली आहेत. 

oscars 2020 nominations joker, once upon a time in hollywood and the irishman get maximum nominations in 92nd academy awards | Oscars 2020 च्या नामांकनात ‘जोकर’चा दबदबा, पाहा संपूर्ण यादी

Oscars 2020 च्या नामांकनात ‘जोकर’चा दबदबा, पाहा संपूर्ण यादी

googlenewsNext
ठळक मुद्देभारताकडून ऑस्कर साठी झोया अख्तरचा ‘गली बॉय’ हा सिनेमा पाठवण्यात आला होता. तो कधीच ऑस्कर शर्यतीतून बाद झाला आहे.

जगभरातील सिनेप्रेमी ज्या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात, त्या 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर  पुरस्कारांची  नामांकने जाहीर झाली आहेत. 
भारतीय वेळेनुसार येत्या 10 फेब्रुवारी रोजी डॉब्ली थिएटरमध्ये हा ऑस्कर  सोहळा रंगणार आहे. यावेळी कोणता चित्रपट बाजी मारणार आणि कोणत्या अभिनेता, अभिनेत्री आणि दिग्दर्शकाला ऑस्कर चा मान मिळवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 
यंदाच्या ऑस्कर  नामांकनात सर्वोत्तम सिनेमा, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेता, ओरिजनल स्कोर, संकलन, सिनेमॅटोग्राफी, पटकथा अशा सात विभागांमधील नामांकनांमध्ये ‘जोकर’ने बाजी मारली आहे. तर क्विंटन टरँटिनोचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’ या चित्रपटाचाही बोलबाला पाहायला मिळतोय.




ऑस्कर  2020 नामांकनात ‘जोकर’ला सर्वाधिक 11 नामांकने मिळाली आहे. तर ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड’, ‘द आयरिशमॅन’ आणि ‘1917’ यासारख्या चित्रपटांना विविध श्रेणीत 10 नामांकने मिळाली आहेत. ‘मेरिज स्टोरी’, ‘पॅरासाईट’, ‘लिटिल स्टोरी’, ‘जोजो रॅबिट’ला 6-6 नामांकने मिळाली आहे.
भारताकडून ऑस्कर साठी झोया अख्तरचा ‘गली बॉय’ हा सिनेमा पाठवण्यात आला होता. तो कधीच ऑस्कर शर्यतीतून बाद झाला आहे.   

सर्वोत्कृष्ट चित्रपट नामांकन
१. फॉर्ड वर्सेस फरारी (Ford v Ferrari)
२. द आईरिश मॅन (The Irishman)
३. जोजो रॅबिट (Jojo Rabbit)
४. जोकर (Joker)
५. लिटिल वुमेन (Little Women)
६. मॅरिज स्टोरी (Marriage Story)
७. 1917
८. वन्स अपोन अ टाइम.. इन हॉलीवुड (Once Upon a Time in Hollywood)
९. पॅरासाइट (Parasite)

सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन 

१. एंटोनियो बॅन्डरस (Antonio Banderas)
२. लियोनार्डो डिकॅप्रियो (Leonardo Dicaprio)
३. एडम ड्राइवर (Adam Driver)
४. जोक्विन फीनिक्स (Joaquin Phoenix) 
५. जोनाथन प्राइस (Jonathan Pryce)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन  
 १. सिन्थिया एरिवो (Cynthia Erivo)
२. स्कारलेट जोहानसन (Scarlett Johansson)
३. साइओर्स रोनेन (Saoirse Ronan)
४. चार्लीज थेरॉन (Charlize Theron)
५. रेने जेल्वेगर (Renée Zellweger)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन  
१. टॉम हैंक्स (Tom Hanks)
२. एंथनी हॉपकिंस (Anthony Hopkins)
३. अल पचीनो (Al Pacino)
४. जो पेस्सी (Joe Pesci)
५.  ब्रॅड पिट (Brad Pitt)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन 
१. कैथी बेट्स (Kathy Bates)
२. लौरा डर्न (Laura Dern)
3. स्कारलेट जोहानसन (Scarlett Johannson)
४. फ्लोरेंस प्यू (Florence Pugh)
५. मार्गोट रोबी (Margot Robbie)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन नामांकन
१. मार्टिन स्कोर्सेसे (Martin Scorsese); चित्रपट- द आयरिशमॅन (The Irishman)
२. टॉड फिलिप्स (Todd Phillips); फिल्म- जोकर (Joker)
३. सॅम मेंडेस (Sam Mendes); चित्रपट- 1917
४. क्वेंटिन टारनटिनो (Quentin Tarantino); चित्रपट- वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवुड (Once Upon a Time in Hollywood)
५. बोंग जून-हो (Bong Joon Ho); फिल्म- पॅरासाइट (Parasite)

सर्वोत्कृष्ट व्हिजुअल इफेक्ट्स : 
१. अवेंजर्स एंडगेम्स (Avengers Endgame)
२. द आयरिशमॅन (The Irishman)
३. 1917
४. द लायन किंग (The Lion King)
५. स्टार वॉर्स: द राइज़ ऑफ़ स्काईवॉकर (Star Wars: The Rise of Skywalker)

सर्वोत्कृष्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्म नामांकन 
१. डेरा (Dcera)
२. हेयर लव (Hair Love)
३. किटबुल (Kitbull)
४. मेमोरेबल (Memorable)
५. सिस्टर (Sister)

एनिमेटेड फीचर फिल्म नामांकन 
१. हाउ टू ट्रेन योर ड्रैगन: द हिडन वर्ल्ड (How to Train Your Dragon: The Hidden World)
२. आई लॉस्ट माई बॉडी (I Lost My Body)
३. क्लॉस (Klaus)
४. मिसिंग लिंक (Missing Link)
५. टॉय स्टोरी 4 (Toy Story 4)
रूपांतरित पटकथा (Adapted Screenplay) नामांकन 
१. द आयरिशमॅन (The Irishman)
२. जोजो रॅबिट (Jojo Rabbit)
३. जोकर (Joker)
४. जस्ट मर्सी (Just Mercy)
५. लिटिल वुमेन (Little Women)
६. द टू पोप्स (The Two Popes)

Web Title: oscars 2020 nominations joker, once upon a time in hollywood and the irishman get maximum nominations in 92nd academy awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.