संगीत विश्वातही PM नरेंद्र मोदींचा 'डंका' ; 'Abundance In Millets' गाणं ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 09:36 AM2023-11-11T09:36:04+5:302023-11-11T10:14:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले 'एबंडेंस इन मिलेट्स' गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले 'एबंडेंस इन मिलेट्स' गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाणं लिहिलं होते जे चर्चेचा विषय ठरलं होतं. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी धान्याचे फायदे त्यांनी सांगितलं आहेत.
संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि मानाचा म्हणून ग्रॅमी अॅवॉर्डकडे पाहिलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याला ग्रॅमीमध्ये . या गाण्याला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. बाजरीसारख्या पौष्टिक धान्याचा प्रचार व्हावा यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं आहे.
एखाद्या नेत्याला ग्रॅमी पुरस्कारांमध्ये नामांकन मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाहच्या मदतीने पंतप्रधानांनी हे गाणं लिहिलं आहे.'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याबद्दल बोलताना फाल्गुनीने ट्वीट केलं होतं की,"धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकर्यांना या पिकांचे उत्पादन घेता यावे यासाठी आणि जगातील उपासमार संपवण्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांसोबत हे गाणं लिहिलं आहे". फाल्गुनी शाह आणि तिचे पती व गायक गौरव शाह यांनी 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याची निर्मिती केली आहे.
'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्यासह आणखी सहा गाण्यांना सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन जाहीर झालं आहे. फाल्गुनी शाह यांना 2022 मध्ये 'अ कलरफुल वर्ल्ड' या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.