​प्रिन्स हॅरीची ‘सुटस्’ गर्लफ्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 04:53 PM2016-11-03T16:53:18+5:302016-11-03T16:55:57+5:30

प्रिन्स हॅरीचे टीव्ही शो ‘सुटस्’मधील प्रसिद्ध स्टार मेघन मार्कलशी प्रेमसुत जुळल्याची जोरदार चर्चा आहे.

Prince Harry's 'Suite' Girlfriend | ​प्रिन्स हॅरीची ‘सुटस्’ गर्लफ्रेंड

​प्रिन्स हॅरीची ‘सुटस्’ गर्लफ्रेंड

googlenewsNext
रिटिश राजघराण्याचा वारसदार प्रिन्स हॅरीचे टीव्ही शो ‘सुटस्’मधील प्रसिद्ध स्टार मेघन मार्कलशी प्रेमसुत जुळल्याची जोरदार चर्चा आहे. तिला भेटण्यासाठी तो गेल्या आठवड्यात थेट कॅनडाला गेला होता.

सुत्रांनी माहिती दिल्यानुसार प्रिन्स हॅरी इतर सर्व कार्यक्रम रद्द करून गुपचूप टोरोंटोला पोहोचला. तेथे तो तिच्यासोबत खासगी सदस्यांसाठी असणाऱ्या हॅलोविन पार्टीलासुद्धा गेला होता. यावेळी तो तिच्याच अपार्टमेंटमध्येच थांबला. 

आसपासच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले काही दिवस एक काळ्या रंगाची एसयूव्ही कार या भागात अनेकवेळा दिसली. एका मॅगझीननुसार २८ आॅक्टोबर रोजी टोरोंटो पिअर्सन एअरपोर्टवरून तो कारमध्ये बसून मार्केलच्या घरी गेला. विशेष म्हणजे दोन दिवसांनंतर ३० आॅक्टोबर रोजी तो टोरोंटोला येणे अपेक्षित होते.

prince harry and meghan markle
द रॉयल अफेयर : प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल

लॉस एंजिलिस येथे जन्म झालेली मार्कल ‘सुट्स’ या टीव्ही मालिकेतील ‘रेचल झेन’ या व्यक्तिरेखेसाठी लोकप्रिय आहे. तिने ‘सीएसआय : मियामी’, ‘९०२१०’, ‘विदाऊट अ ट्रेस’ आणि ‘जनरल हॉस्पिटल’ या मालिकांमध्येसुद्धा तिने काम केलेले आहे. याबरोबरच ‘गेट हिम टू द ग्रीक ’, ‘रिमेम्बर मी’ आणि ‘हॉरिबल बॉसेस’ या चित्रपटांमध्येदेखील ती झळकली आहे.

मीडियाच्या तामझामापासून दूर हॅरीसोबत निवांत क्षण घालवता आल्यामुळे मेघन सध्या जाम खुश असल्याचे सांगितले जातेय. तिने तर रॉयल फॅमिलीतील इतर सदस्यांसोबतसुद्धा ओळख वाढवली आहे. सोशल मीडियावर सक्रीय राहणाऱ्या मेघनने नुकतेच हॅरीची चुलत बहीण प्रिन्सिेस युजिनला इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरूवात केली आहे. परंतु हॅरी तिची राणीसोबत एवढ्यात तरी भेट घालून देईल याची शक्यता फार कमी आहे.
                                  


राजवाड्यातील एका सुत्रानुसार, या नव्या रिलेशनशिपमुळे हॅरी अत्यंत आनंदी असून एवढा खुश त्याला यापूर्वी कधीच पाहिलेले नाही. एका मुलाखतीमध्ये मेघननेसुद्धा सांगितले की, ‘मी जगातील सर्वात भाग्यशाली मुलगी आहे.’ तिने इन्स्टाग्रामवर रोमॅण्टिक फोटोज् शेअर करण्यासही सुरुवात केली आहे. नुकताच तिने दोन केळींचा फोटो अपलोड करून ‘स्लिपिंग टाईट’ असे कॅप्शन दिले. ती बहुधा प्रिन्स हॅरीला निर्देशित करीत आहे असा अंदाज बांधला जातोय.

Web Title: Prince Harry's 'Suite' Girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.