प्रियांका चोप्राने असा साजरा केला निक जोनासचा वाढदिवस! देसीगर्लसाठी बदलले लूक!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 11:32 AM2018-09-16T11:32:45+5:302018-09-16T11:42:56+5:30
प्रियांका चोप्रा आणि तिचा मंगेतर निक जोनास यांचा ‘रोका’ झाला. लवकरचं प्रियांका व निक लग्न करणार आहेत. त्यापूर्वी निक व प्रियांका दोघेही बर्थ डे सेलिबे्रशनमध्ये बिझी आहेत.
प्रियांका चोप्रा आणि तिचा मंगेतर निक जोनास यांचा ‘रोका’ झाला. लवकरचं प्रियांका व निक लग्न करणार आहेत. त्यापूर्वी निक व प्रियांका दोघेही बर्थ डे सेलिबे्रशनमध्ये बिझी आहेत. होय, आज(16 सप्टेंबर) निकचा वाढदिवस. प्रियांकासाठी निकने खास लूक चेंज केले आहे. सध्या त्याच्या या नवीन लूकचे बरेच फोटो व्हायरल होत आहे.
प्रियांकाचा होणारा पती निक हा एक मोठा सिंगर आहे. सोबतचं साँग रायटर, अॅक्टर, आणि म्युझिक प्रोड्युसर अशीही त्याची ओळख आहे. निकोलस जेरी जोनास असे निकचे पूर्ण नाव. 16 सप्टेंबर 1992 रोजी अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डल्लास शहरात निकचा जन्म झाला. निक जोनासचे वडील पॉल केव्हिन जोनास हे सुद्धा गीतकार आणि संगीतकार आहेत.
निकची आई डेनिस मिलर जोनास सुद्धा सिंगर आणि साइन लँग्वेज टीचर होत्या. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण निकने आपल्या वयाच्या 7 व्या वषार्पासूनच काम सुरू केले होते. 2002मध्ये निकने पहिले गाणे गायले होते. जॉय टू द वर्ल्ड हे त्याचे पहिले गाणे. हे गाणे त्याने स्वत: लिहिले होते. यानंतर निकने आपल्या भावांसोबत मिळून जोनास ब्रदर्स नावाचा एक बँड बनवला. याचे चार अल्बम प्रचंड लोकप्रीय आहेत. प्रियांकाने जोडीदार म्हणून निवड केलेला निक जोनास एका लाईव्ह कॉन्सर्टसाठी ३५ ते ७० लाख रूपये मानधन घेतो. वर्षाकाठी तो १७१ कोटी रूपये कमवतो, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. महागड्या गाड्यांचा शौकीन असलेला निक प्रियांकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
प्रियांका व निकची पहिली भेट ‘क्वांटिको’च्या सेटवर झाली होती. यानंतर गतवर्षी १ मे रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये प्रियांका व निक एकत्र रेड कार्पेटवर दिसले होते.
प्रियांका चोप्राला डेट करण्यापूर्वी निकच्या एक दोन नाही तर 8 गर्लफ्रेंड होत्या. त्यामध्ये प्रसिद्ध पॉप स्टार आणि डिझनी सिंगर राहिलेली मायली सायरस आणि सेलेना गोमेज यांचा समावेश आहे. मिली निकची पहिली गर्लफ्रेंड होती. तेव्हा निक फक्त 13 वर्षांचा होता. निक आणि मिलीने 2006 मध्ये एकमेकांना डेट करणे सुरु केले होते. दोघं पहिल्यांदा चॅरिटी इव्हेंटमध्ये भेटले होते. मिलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2008 मध्ये निक सेलेना गोमेजच्या प्रेमात पडला. परंतू दोघांचे नाते जास्त दिवस चालले नाही. काही महिन्यांनंतरच 2009 मध्ये ते वेगळे झाले.फेब्रुवारी 2012 मध्ये निकने डेल्टाला डेट केले आणि यानंतर हे दोघं वेगळे झाले. ओलिवियासोबत निक दिर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होता. 2013 मध्ये यांचे नाते सुरु झाले. तर 2 वर्षांनंतर 2015 मध्ये हे दोघं वेगळे झाले. यानंतर निक आणि केंडालने एकमेकांना डेट करणे सुरु केले होते. तुम्हाला वाटत असेल की, प्रियांका निकपेक्षा वयाने मोठी आहे. परंतू आपल्या वयापेक्षा मोठ्या मुलीला डेट करण्याची निकची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी 2015 मध्ये त्याने आपल्यापेक्षा 14 वर्षे मोठ्या केटला टेड करणे सुरु केले होते. 2016 मध्ये निक आणि लिली एकमेकांना डेट करत होते. परंतू हे नाते वर्षभरही टिकू शकले नाही.2017 मध्ये निक जॉर्जियाला डेट करत असल्याचे वृत्त आले होते.