न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोणचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 10:23 AM2017-02-17T10:23:32+5:302017-02-17T17:49:09+5:30

बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणाºया अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमधील चर्चेतील चेहरे बनले आहेत. सध्या या ...

Priyanka Chopra in New York Fashion Week, Deepika Padukone's Jalna | न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोणचा जलवा

न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोणचा जलवा

googlenewsNext
लिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणाºया अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमधील चर्चेतील चेहरे बनले आहेत. सध्या या दोघी न्यू यॉर्कमध्ये आयोजित फॅशन वीकमध्ये बघावयास मिळाल्या असून, त्यांची उपस्थिती अनेकांना आश्चर्यचकीत करणारी ठरत आहे.  
दीपिकाचा विन डिझेलसोबतचा ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सिनेमा गेल्या महिन्यात रिलीज झाला असून, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भारतीय प्रेक्षकांनी या सिनेमाला नाकारले असेल तरी, इतर देशांमध्ये मात्र सिनेमाने चांगला गल्ला जमविला आहे, तर प्रियांकाचा द रॉकसोबतचा ‘बेवॉच’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमांमुळे दोघीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहत आहेत. प्रियंकाने नेपाळी डिझायनर प्रबल गौरंगच्या फॅशन शोमध्ये गेल्या आठवड्यातच एंट्री केली होती, तर दीपिका गेल्या गुरुवारी डिझायनर राल्फ लॉरेल याच्या फॅशन शोमध्ये बघावयास मिळाली. }}}} ">.@priyankachopra front row at @prabalgurung's #NYFW show with @HumaAbedin, #DianeKruger and @SJPpic.twitter.com/JBlqlMBFg9— Priyanka Chopra FC (@priyankaaddicts) February 13, 2017प्रियंका चोपडा गेल्या काही महिन्यांपासून न्यू यॉर्कमध्ये तळ ठोकून आहे. ‘क्वांटिको’ या अमेरिकन टीव्ही सिरियलची शूटिंग आणि ‘बेवॉच’च्या प्रमोशनमध्ये ती व्यस्त असल्याने अशा शो अथवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ती हजेरी लावत आहे. गौरांगच्या या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रियंकाने फॉल २०१७ डिझायनर कलेक्शनमधील ड्रेस परिधान केला होता. टॅक्स्ड टॉप आणि हेम स्कर्टमध्ये असलेल्या प्रियंकाची अदा बघण्यासारखी होती. या ड्रेसवर तिने सुज आणि जॅकेट परिधान केले होते. या शोमध्ये प्रियंका पहिल्याच रांगेत बसलेली होती. यावेळी तिच्याजवळ हिलेरी क्लिंटनची एकेकाळची सल्लागार हुमा आबदिन बसलेली होती. त्याचबरोबर साराह जैसिका पारकरही तिच्याजवळ बसलेली होती.  }}}} ">Deepika Padukone seated in the front row at the Ralph Lauren show. #NYFW17pic.twitter.com/NcarIRfyI7— Deepika Addicts (@deepikaddicts) February 16, 2017तर दुसरीकडे दीपिका पादुकोण दोन डिझायनर्सच्या शोमध्ये हजेरी लावताना बघावयास मिळाली. पहिल्या दिवशी ती मिशेल कोर्स या डिझायनरच्या शोमध्ये पोहचली होती. नेवी ब्लू रंगाच्या ट्रेंच ड्रेसमध्ये दीपिका खूपच स्टनिंग दिसत होती. यावेळी दीपिकाने हायनेक टॉप घातला होता. यावर दीपिकाने खूपच जबरदस्त मेकअप केला होता, ज्यामुळे तिचे सौंदर्य खुलून दिसत होते, तर गेल्या गुरुवारी ती राल्फ लॉरेलच्या शोमध्ये पोहचली होती. शोमध्ये ती पहिल्या रांगेत बसलेली होती. यावेळी दीपिकासोबत काढलेला एक सेल्फी अमेरिकन अभिनेत्री कामिला हिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. दीपिकाने आॅफ व्हाइट रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केलेला होता. 

Web Title: Priyanka Chopra in New York Fashion Week, Deepika Padukone's Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.