प्रियंका चोप्राच्या जाऊबाई सोफी टर्नरने मुलांसाठी उचललं मोठं पाऊल, पतीवर दाखल केला खटला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 09:42 AM2023-09-22T09:42:41+5:302023-09-22T15:35:22+5:30

‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोफी टर्नर ( sophie turner) आणि पॉप सिंगर जो जोनास (Joe jonas) ही जोडी लवकरच विभक्त होण्याच्या मार्गावर आहे.

Priyanka chopra relatives sophie turner filed case against estranged husband joe jonas for wrongful retention of their daughter amid split | प्रियंका चोप्राच्या जाऊबाई सोफी टर्नरने मुलांसाठी उचललं मोठं पाऊल, पतीवर दाखल केला खटला

प्रियंका चोप्राच्या जाऊबाई सोफी टर्नरने मुलांसाठी उचललं मोठं पाऊल, पतीवर दाखल केला खटला

googlenewsNext

देसीगर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या कुटुंबात सुरु असणाऱ्या वादांना घेऊन चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रियंकाच्या  दीरान् पत्नीपासून विभक्त होण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सोफी टर्नर ( sophie turner) आणि पॉप सिंगर जो जोनास (Joe jonas) ही जोडी लवकरच विभक्त होण्याच्या मार्गावर आहे. याच दरम्यान सोफीने एक मोठे पाऊल उचलत आपल्या पतीविरोधात खटला दाखल करुन  आपल्या मुलींना परत करण्याची मागणी केली आहे.


रिपोर्टनुसार, सोफी टर्नरने  जो जोनास विरुद्ध खटला दाखल केला आहे. अभिनेत्रीने कोर्टात दावा दाखल केला आहे आणि आपल्या मुलींना इंग्लंडला परत येण्याची मागणी केली आहे. "वडिलांनी मुलींनी इंग्लंडला परत जाण्यापासून रोखले आहे, त्याने अधिकारांचे उल्लंघन केलं आहे, इंग्लंड हे मुलांचे नेहमीचे निवासस्थान आहे," खटल्यात म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार, सोफी तिचा आगामी चित्रपट जोनच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने, तिने आणि जो ने त्यांच्या मुलींना दौऱ्यावर सामावून घेण्याचे मान्य केले, वडिलांकडे दिवसभरात मुलींसाठी जास्त वेळ असेल, असे अहवालात नमूद केले आहे. तथापि, अभिनेत्री मुलींसाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल संकोच करत होती.


 सोफी आणि जो 17 सप्टेंबर 2023 रोजी भटले. या भेटीदरम्यान, दोघांनीही त्यांच्या मुलींना इंग्लंडला परतण्यासाठी त्यांच्या करारावर सहमती दर्शवली.  मात्रनंतर  जो ने मुलींना सोफीसोबत पाठवण्यास नकार दिला आणि आपल्या मुलींचे पासपोर्टही परत केले नाहीत. रिपोर्टनुसार, "वडिलांकडे मुलांचे पासपोर्ट आहेत. त्यांनी आईला पासपोर्ट परत करण्यास नकार दिला आणि मुलींना आईसोबत इंग्लंडला पाठवण्यासही नकार दिला."

जो आणि सोफी ही जोडी २०१६ पासून एकमेकांना डेट करत होती. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला. तर, २०१९ मध्ये लग्न केलं. त्याचसोबत या जोडीला दोन मुलंदेखील आहेत. जो हा निक जोनास याचा मोठा भाऊ आहे.


 

Web Title: Priyanka chopra relatives sophie turner filed case against estranged husband joe jonas for wrongful retention of their daughter amid split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.