Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 01:33 PM2021-05-14T13:33:51+5:302021-05-14T13:45:02+5:30

Video: सोफीने संताप व्यक्त करणारा एक व्हिडीओ इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. यात सोफीचा चेहरा दिसत नाही. पण तिचा संताप स्पष्ट दिसतोय.

Priyanka Chopra sister-in-law sophie turner sickened and disgusted as paparazzi click her daughter | Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा

Video: प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफी टर्नर वैतागली; म्हणाली, हा किळसवाणा प्रकार थांबवा

googlenewsNext
ठळक मुद्देसोफी टर्नर व जो जोनास 2016 पासून एकमेकांना डेट करत होते. 2017 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.  त्यानंतर एका सरप्राईज सेरेमनीत दोघांनी लग्न केले होते.

हॉलिवूड अभिनेत्री व प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) जाऊबाई सोफी टर्नर (Sophie Turner) सध्या जाम वैतागली आहे. कुणावर तर पिच्छा पुरवणा-या पापाराझींवर. होय, फोटोग्राफर्सनी सोफीला अगदी वैताग आणला आहे. घराबाहेर तासन् तास उभ्या राहणा-या आणि मुलीचे फोटो काढण्यासाठी ना-ना खटाटोप करणा-या या पापाराझींवर सोफी आता चांगलीच भडकलीये.
सोफीने संताप व्यक्त करणारा एक व्हिडीओ इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला आहे. यात सोफीचा चेहरा दिसत नाही. पण तिचा संताप स्पष्ट दिसतोय.

व्हिडीओत ती म्हणते, ‘मी आत्ता झोपेतून उठले. माझ्या मते, काल काही पापाराझी माझ्या विलाचे फोटो घेण्यात यशस्वी ठरले. मी फक्त एवढेच सांगू इच्छिते की, मी माझ्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीये. ती पापाराझींपासून दूर राहावी, हाही माझा प्रयत्न आहे. माझ्या लेकीचे फोटो मला सोशल मीडियावर नको आहेत. ती माझी मुलगी आहे. तिने हे आयुष्य मागितले नव्हते, ना तिला फोटो काढायचे होते. पण अर्ध्या वयाचे लोक तिचे फोटो काढण्यासाठी खटाटोप करत आहेत, ते सुद्धा तिच्या मर्जीविना. हे प्रचंड किळसवाणे आहे, मी खूप आदरपूर्वक तुम्हाला विनंती करते की, माझ्या मुलीचे फोटो काढून ते प्रिंट करणे बंद करा. कारण यासाठी मी तुम्हाला परवानगी दिलेली नाही.’

सोफीने 2019 मध्ये जो जोनाससोबत लग्न केले होते. जुलै 2000 मध्ये दोघांना मुलगी झाली. तिचे विला असे नामकरण करण्यात आले. सोफी टर्नरने प्रेग्नंसीदरम्यान बेबी बम्पचे अनेक फोटो शेअर केले होते. पण मुलीला मात्र तिने अद्याप जगापासून लपवून ठेवले आहे. मुलीचा एकही फोटो तिने आत्तापर्यंत शेअर केलेला नाही. सोफी ही प्रियंका चोप्राची जाऊ आहे. सोफीचा नवरा जो हा प्रियंकाचा पती निक जोनासचा भाऊ आहे.

सोफी टर्नर व जो जोनास 2016 पासून एकमेकांना डेट करत होते. 2017 मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.  त्यानंतर एका सरप्राईज सेरेमनीत दोघांनी लग्न केले होते. यानंतर लगेच पॅरिसमध्ये दोघांचे धुमधडाक्याने लग्न झाले होते. जोच्या लग्नाआधी निक जोनास व प्रियंकाचे लग्न झाले होते. सोफी व जो या लग्नाला हजर होते.

Web Title: Priyanka Chopra sister-in-law sophie turner sickened and disgusted as paparazzi click her daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.