प्रियांका चोप्राची ‘क्वांटिको’ मालिका पडणार बंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 08:19 AM2017-02-11T08:19:58+5:302017-02-11T13:50:42+5:30

प्रियांका चोप्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिलेली ‘क्वांटिको’ मालिका दुसऱ्या सीझननंतर बंद पडणार असल्याची चर्चा आहे. मालिकेला प्रेक्षकांचा मिळणारा ...

Priyanka Chopra's 'Quantico' series will fall? | प्रियांका चोप्राची ‘क्वांटिको’ मालिका पडणार बंद?

प्रियांका चोप्राची ‘क्वांटिको’ मालिका पडणार बंद?

googlenewsNext
रियांका चोप्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिलेली ‘क्वांटिको’ मालिका दुसऱ्या सीझननंतर बंद पडणार असल्याची चर्चा आहे. मालिकेला प्रेक्षकांचा मिळणारा थंड प्रतिसाद पाहता चॅनेल तिसऱ्या सीझनला हिरवा कंदिल दाखविण्यास उत्सुक नसल्याचे कळतेय.

‘कॉफी विथ करण’मध्ये प्रियांकाने सांगितले होते की, यावर्षी एप्रिल-मेपर्यंत ती दुसऱ्या सीझनची शूटींग करणार आहे. परंतु टीव्ही रेटिंगमध्ये होणारी घट मालिका बंद पाडू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मालिकेमुळेच प्रियांकाला अमेरिकेत अमाप प्रसिद्धी मिळाली. दोनवेळा ती ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड’ची मानकरीदेखील ठरली.

ALSO READ: प्रियांका चोप्राला तोडायचा आहे ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनचा ‘दोस्ताना’

क्वांटिकोच्या पहिल्या सीझनप्रमाणे दुसऱ्या सीझनला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जानेवारी महिन्यापासून रविवारचा प्राईम टाईम काढून हा शो सोमवारी रात्री दाखवण्यात येत आहे. शो कॅन्सल होण्याचे हे पहिले लक्षण मानण्यात येत आहे. मालिकेची टार्गेट आॅडियन्स तरुण मंडळी आहेत. परंतु त्यांचा रिस्पॉन्स समाधानकारक नाहीए.

त्याबरोबरच मालिकेच्या कथानकाबाबतही अनेक तक्रारी आहेत. प्रियांका चोप्राचे मुख्य पात्र अ‍ॅलेक्स पेरिश एवढे शक्तीशाली आणि बुद्धीवान दाखवले आहे की, कोणत्याही संकटातून ती सहज बाहेर पडते. प्रेक्षकांना उत्कंठा लागावी असे काहीच घडत नसल्यामुळे ते दूर जात आहेत. ती संकटात आहे असे कधीच वाटत नाही.

ALSO READ: ‘या’ चित्रपटात प्रियांका चोप्रा साकारणार वेश्या!

आता या सर्व जरी चर्चा असल्या तरी निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा अथवा माहिती देण्यात आलेली नाही. मेमध्ये शूटींग संपल्यावर तिसऱ्या सीझनची घोषणा केली जाणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

‘क्वांटिको’नंतर प्रियांका तिचा हॉलीवूड डेब्यू सिनेमा ‘बेवॉच’च्या प्रोमोशनमध्ये व्यस्त होणार आहे. ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉन हे तिचे सहकलाकार आहेत. नव्वदच्या दशकात अत्यंत गाजलेल्या टीव्ही सिरीजवर हा चित्रपट आधारित आहे. बॉलीवूडमध्ये ती संंजय लीला भंसाळी यांच्या आगामी चित्रपटात वेश्येच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Priyanka Chopra's 'Quantico' series will fall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.