​लायन या चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळाल्याने देव पटेलचा आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2017 10:42 AM2017-01-25T10:42:26+5:302017-01-25T16:12:26+5:30

देव पटेलने स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि केवळ 9-10 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ऑस्करपर्यंत मजल मारली. ...

Receiving Oscar nomination for Lion, Mavenna enjoys Dev Patel | ​लायन या चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळाल्याने देव पटेलचा आनंद गगनात मावेना

​लायन या चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळाल्याने देव पटेलचा आनंद गगनात मावेना

googlenewsNext
व पटेलने स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि केवळ 9-10 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ऑस्करपर्यंत मजल मारली. ऑस्कर हा पुरस्कार मिळावा अशी केवळ बॉलिवूडच्याच नव्हे तर हॉलिवूडच्या कलाकारांचीदेखील इच्छा असते. 
देवला लायन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहकलाकार या कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे. लायन या चित्रपटाला ऑस्करच्या विविध सहा कॅटेगरीत नामांकन मिळाले असल्याने या चित्रपटाची टीम सध्या प्रचंड खूश आहे. 
लायन ही एका पाच वर्षांची मुलाची कथा आहे. तो मुलगा जेवणाच्या शोधात असताना कोलकाता या शहरात हरवतो आणि काही काळानंतर एक ऑस्ट्रेलियामधील कुटुंब त्याला दत्तक घेते आणि तो कायमचा ऑस्ट्रेलियाला निघून जातो. पण मोठा झाल्यानंतर तो गुगल अर्थच्या मदतीने आपल्या आई वडिलांचा शोध घेण्याचे ठरवतो आणि त्यांच्या शोधासाठी वणवण फिरतो. ही कथा सरू ब्राइरली या माणसाच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे. यावर अ लाँग वे होम हे पुस्तक लिहिण्यात आले होते. या पुस्तकाची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतरच या पुस्तकावर चित्रपट बनवण्यात आला. देव पटेलसाठी ऑस्कर या पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळणे ही खूपच मोठी गोष्ट आहे. इतक्या मोठ्या पुरस्काराचे नामांकन मिळाले यावर त्याचा आजही विश्वास बसत नाहीये. तो सांगतो, "खरे सांगू तर मला ऑस्करचे नामांकन मिळाले यावर माझा आजही विश्वास बसत नाहीये. मला पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळाल्याचा फोन आला होता. यानंतर माझ्या घरातील लोक, फ्रेंड्स प्रचंड खूश झालेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप बरे वाटत आहे. ऑस्करचे नामांकर मिळाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठी आहे." 

Web Title: Receiving Oscar nomination for Lion, Mavenna enjoys Dev Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.