​दोन चित्रपटांनंतर रेडफोर्ड होणार निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2016 06:57 PM2016-11-13T18:57:37+5:302016-11-13T18:57:37+5:30

लेजेंडरी हॉलीवूड अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड आगामी दोन चित्रपटांनंतर अभिनयातून संन्यास घेणार आहेत. त्यांचा नातू डिलनने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या ...

Redford will retire after two films | ​दोन चित्रपटांनंतर रेडफोर्ड होणार निवृत्त

​दोन चित्रपटांनंतर रेडफोर्ड होणार निवृत्त

googlenewsNext
जेंडरी हॉलीवूड अभिनेते रॉबर्ट रेडफोर्ड आगामी दोन चित्रपटांनंतर अभिनयातून संन्यास घेणार आहेत. त्यांचा नातू डिलनने घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी या निर्णयाची घोषणा केली. याबरोबरच त्यांनी स्टोरीटेलिंग, चित्रकला आणि अ‍ॅक्टिंगमधून निवृत्ती घेऊन रेखाचित्रण व दिग्दर्शनावर भर देण्याचा मानस व्यक्त केला.

डिलने जेव्हा त्यांना विचारले की तुम्ही पेंटिंग्सकडे वळणार का? यावर ते म्हणाले, हो. या वयात मला खूप अस्वस्थता जाणवत राहते. त्यामुळे चित्रिकरणा दरम्यान एकामागून एक टेक देणं मला खूप कटकटीचं वाटतं. माझं ऐंशी आहे. या वयात कोणावर विसंबून न राहणे मला जास्त आनंदी वाटते. रेखाचित्रण करत असताना केवळ मी असतो. त्यामुळे आगामी काळात मला त्यावर अधिक लक्ष द्यायचे आहे.

सध्या हातातील दोन चित्रपटांची शूटींग पूर्ण करून तो अभिनयाला रामराम ठोकणार आहे. त्यामध्ये जेन फोंडासोबतचा ‘अवर सोल्स अ‍ॅट नाईट’ आणि केसी अ‍ॅफ्लिेक बरोबर ‘ओल्ड मॅन वुईथ अ गन’ या सिनेमांचा सामावेश आहे. तसेच काम पूर्ण झालेले परंतु अद्याप रिलीज न झालेल्या ‘द डिस्कव्हरी’ आणि ‘कम संडे’ अशा फिल्म्समध्येसुद्धा तो झळकणार आहे.

येथून पुढे दिग्दर्शन करण्याचासुद्धा त्यांचा विचार आहे. त्याने १९८० साली दिग्दर्शित केलेल्या ‘आॅर्डिनरी पीपल’साठी त्याला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा आॅस्कर मिळाला होता. तसेच २००२ साली अ‍ॅकॅडमीने त्याचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे ‘अ वॉक इन द वूड्स’ जो की, २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता.

Web Title: Redford will retire after two films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.