‘आयर्नमॅन’ तुला झालं तरी काय? कॅप्टन अमेरिका, स्पायडर मॅन सगळ्यांना केलं अनफॉलो, चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 12:39 PM2021-07-08T12:39:37+5:302021-07-08T12:46:34+5:30
‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने अलीकडे आपल्या सर्व चाहत्यांना ‘जोर का झटका’ दिला. होय, ‘आयर्नमॅन’ने असं काही केलं की, अख्ख्या जगभरातील त्याचे चाहते टेन्शनमध्ये आलेत.
हॉलिवूडचा सुपरस्टार ‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने (Robert Downey Jr) अलीकडे आपल्या सर्व चाहत्यांना ‘जोर का झटका’ दिला. होय, ‘आयर्नमॅन’ने असं काही केलं की, अख्ख्या जगभरातील त्याचे चाहते टेन्शनमध्ये आलेत. रॉबर्ट हॉलिवूडचा लोकप्रिय सुपरस्टार आहे. जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक त्याचे फॉलोअर्स आहेत. त्यामुळे रॉबर्ट साधा शिंकला तरी त्याची दखल चाहते घेतात. अशात रॉबर्टने अख्ख्या मार्व्हल कलाकारांना अनफॉलो केल्यावर काय होईल? जगभरातील सगळे चाहते प्रश्न विचारू लागलेत.
रॉबर्टने इन्स्टाग्रामवर त्याच्यासोबत काम केलेल्या ‘अॅव्हेंजर्स’च्या सर्व कलाकारांना अनफॉलो केले. अगदी कॅप्टन अमेरिकाची भूमिका साकारणारा क्रिस इवांस आणि स्पायडर मॅन म्हणून लोकप्रिय असणा-या टॉम हॉलंड या दोघांनाही अनफॉलो केले. क्रिस व टॉम रॉबर्टचे खूप जवळचे मित्र मानले जातात. साहजिकच रॉबर्टने त्यांनाही अनफॉलो केले म्हटल्यावर चाहते हैराण झालेत. मार्व्हल कलाकारांमध्ये कोल्ड वॉर तर सुरू नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला. मग काय चाहत्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली?
sir why did you unfollowed the mcu cast 😭😭
— ًaria loki & bw era (@ariasromanoff) July 1, 2021
रॉबर्ट तू मार्व्हलच्या तुझ्या सर्व सहकलाकारांना अनफॉलो का केलंस? काय झालं? असे असंख्य प्रश्न चाहत्यांनी विचारायला सुरूवात केली. रॉबर्ट मी यासाठी अजिबात तयार नाही, हे म्हणजे सगळं काही संपल्यासारखं आहे, अशी भावुक कमेंट करत एका युजरनं आपल्या भावना व्यक्त केल्यात.
@RobertDowneyJr unfollowed the entire cast of Marvel and is permanently parting way with Marvel.😔😔
— Sɯιƙαɾ Aƈԋαɾყα (@sweekar_) July 2, 2021
OMG IT IS TRUE ROBERT DOWNEY JR UNFOLLOWED ALL MARVEL CAST MEMBERS. WHAT HAPPENED?!🥲 #marvel
— Trabant 🚗 (@Bmerci04) July 1, 2021
म्हणून केलं अनफॉलो?
रॉबर्टनं एक नवी सोशल मीडिया मॅनेजर कामावर ठेवला आहे. कदाचित त्याच्या सल्ल्यानुसार, रॉबर्टनं हे पाऊल उचललं असावं, असं अनेकांचं मत आहे. काहींच्या मते, रॉबर्टचं इन्स्टा अकाऊंट आता फक्त बिझनेस अकाऊंट म्हणून वापरलं जाणार आहे. यामुळं त्यानं आपल्या सहकलाकारांना अनफॉलो केलं. यामागे अन्य कुठलंही भांडण वा कारण नाही.
Robert Downey Jr. Instagram account is now his Business Account. He unfollowed every Marvel Cast today, but there were no fights pic.twitter.com/CpG2dMMRtV
— Multiverse_Saga (@SagaMultiverse) July 2, 2021
2007 साली आयर्नमॅन या सुपरहिरोपटापासून सुरू झालेली अॅव्हेंजर्स मालिका आज जगातील सर्वात मोठी चित्रपटमालिका म्हणून ओळखली जाते. मार्व्हल कंपनीनं मिळवलेल्या या भव्यदिव्य यशामागं आयर्नमॅन व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचा सिंहाचा वाटा आहे.
रॉबर्ट डाऊनी हा मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्ससाठी हुकुमाचा एक्का आहे असं म्हटलं जातं. आजवर त्याच्याच लोकप्रियतेचा वापर करून मार्व्हलनं सलग 22सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अॅव्हेंजर्स एंडगेमचा पहिला भाग अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरसाठी त्याला मानधन म्हणून 216कोटी रुपये देण्यात आले होते.आजच्या तारखेला रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर हा जगातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो.