टेलर ड्रेकचा पार्टीत रोमांस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 05:16 PM2016-10-28T17:16:10+5:302016-10-28T17:17:09+5:30

रॅपर ड्रेक आणि गायिका टेलर स्विफ्ट हे जोडपे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यातील प्रेमप्रकरणामुळे नव्हे तर त्यांच्यातील रोमांसमुळे सध्या ...

Romance of Taylor drake party | टेलर ड्रेकचा पार्टीत रोमांस

टेलर ड्रेकचा पार्टीत रोमांस

googlenewsNext
पर ड्रेक आणि गायिका टेलर स्विफ्ट हे जोडपे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यातील प्रेमप्रकरणामुळे नव्हे तर त्यांच्यातील रोमांसमुळे सध्या ही जोडी चर्चेचा विषय ठरत आहे. 
त्याचे झाले असे की, ड्रेकने त्याच्या वाढदिवसानिमित्त एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. अर्थात या पार्टीला टेलर ही क्लोज गेस्ट म्हणून उपस्थित होती. ड्रेक आणि टेलरची पार्टीतील एंट्री अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. एकमेकांचा हातात हात घेऊन दोघेही चांगल्या मूडमध्ये बघावयास मिळत होती. पार्टीत ड्रेकने टेलरसोबत खूप मस्ती केली. दोघांमधील रोमांस अनेकांची बोलती बंद करणारा होता. विशेष म्हणजे या पार्टीत माध्यम प्रतिनिधींची उपस्थिती असल्याने लगेचच या दोघांमधील रोमांसची चर्चा रंगली. 
गेल्या काही दिवसांपूर्वीच ड्रेकने स्विफ्टला त्याच्या आईला भेटविले होते. तसेच तो त्याच्याजवळच्या नातेवाइकांनाही स्विफ्टची ओळख करून देत आहे. 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट टेलरच्या ३०व्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली होती. यावेळी ड्रेकने स्विफ्टला त्याच्या आईबरोबरच जवळच्या मित्रांचीदेखील ओळख करून दिली. या अगोदर २०१३ मध्ये एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अवॉर्डच्या कार्यक्रमादरम्यान दोघे एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांसोबत फोटोही काढले होते. आता पुन्हा दोघे रोमांस करताना एकत्र बघावयास मिळत असल्याने लवकरच या प्रेमाचे रूपांतर विवाहात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, विवाहाबाबत दोघांनाही विचारले असता, त्यांनी यावर बोलणे टाळले. अर्थातच टेलर स्विफ्टने करिअरला अधिक प्राधान्य दिले असल्याने ती लगेचच विवाहाच्या बंधनात अडकणार नाही, हे निश्चित. 

 

Web Title: Romance of Taylor drake party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.