Oscars 2023: लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्याला सुरुवात, RRRवर खिळल्या भारतीयांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 06:02 AM2023-03-13T06:02:13+5:302023-03-13T06:30:57+5:30
लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscars 2021) आता सुरुवात झाली आहे.
लॉस एंजलिसमध्ये 95 व्या ऑस्कर सोहळ्याला (Oscars 2021) आता सुरुवात झाली आहे. यावेळी हा सोहळा भारतासाठी खूप खास आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतीयांसाठीही खास असणार आहे. कारणही खास आहे. यंदाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाण्याचा पुरस्कार जिंकणारा साऊथचा सिनेमा RRR देखील ऑस्करच्या शर्यतीत सामील आहे.
पहिल्यांदा भारताला ऑस्करमध्ये तीन नामांकने मिळाली आहेत. भारताच्या 'आरआरआर' (RRR) या सिनेमातील नाटू नाटू या गाण्याला ऑस्करमध्ये बेस्ट ओरिजनल सॉंग्स या गटात नामांकन मिळालं आहे.
Meet your first slate of presenters for the 95th Oscars.
— The Academy (@TheAcademy) March 2, 2023
Tune into ABC to watch the Oscars LIVE on Sunday, March 12th at 8e/5p! #Oscars95pic.twitter.com/U87WDh88MR
या गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्सही ऑस्करच्या मंचावर बघायला मिळणार आहे. याशिवाय ऑल दॅट ब्रीथ्स आणि द एलिफंट व्हिस्पर्स हे सिनेमे ऑस्करच्या शर्यतीत आहेत. नामांकनाव्यतिरिक्त, बॉलिवूड दिवा दीपिका पादुकोण देखील ऑस्करमध्ये प्रेझेंटर असेल.
जेमी ली कर्टिसला 'एव्हरीव्हेअर एव्हरीव्हन ऑल अॅट वन्स' मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. के हुआ क्वानने 'एव्हरीव्हेअर एव्हरीव्हन ऑल अॅट वन्स' मधील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे.