स्कॉरलेट जॉन्सन म्हणते, कामचलाऊ आई होणे आव्हानात्मक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 04:55 PM2017-02-10T16:55:04+5:302017-02-10T22:25:04+5:30

हॉलिवूड अभिनेत्री स्कॉरलेट जॉन्सनचे म्हणणे आहे की, कामचलाऊ आई होणे खºया अर्थाने आव्हानात्मक आहे. त्याचबरोबर हे एकप्रकारचे गिफ्टही आहे. ...

Scorlett Johnson says it is challenging to have a permanent mother | स्कॉरलेट जॉन्सन म्हणते, कामचलाऊ आई होणे आव्हानात्मक

स्कॉरलेट जॉन्सन म्हणते, कामचलाऊ आई होणे आव्हानात्मक

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री स्कॉरलेट जॉन्सनचे म्हणणे आहे की, कामचलाऊ आई होणे खºया अर्थाने आव्हानात्मक आहे. त्याचबरोबर हे एकप्रकारचे गिफ्टही आहे. कारण अनंत अडचणींचा सामना करून मी दोन मुलांमध्ये संतुलन ठेवण्याची कला अवगत केली आहे. 

इटीआॅनलाइन डॉट कॉम या वेबसाइटला स्कॉरलेटने सांगितले की, मी मुलांच्या पालनपोषण करण्यात इतरांच्या तुलनेत पारंगत असल्याचा किंवा मला खूपच ज्ञान असल्याचा दिखावा कधीच करीत नाही. त्यामुळे मी स्वत:ला तात्पुरती आई असे संबोधत असून, मुलांचे पालनपोषण आव्हानात्मक आणि अविश्वसनीय गिफ्ट असल्याचे समजते.



याविषयी स्कॉरलेट म्हणतेय की, मी मुलांच्या पालनपोषणासाठी अधिक वेळ देऊ शकत नसल्याने स्वत:ला अपराधी समजते. कारण मी बºयाचदा मुलांसोबत आनंदाचे क्षण सेलिब्रेट केले नाहीत. अशावेळेस मूल आणि आई या नात्यात संतुलन राखताना खºया अर्थाने दमछाक होते. मात्र माझ्यासारख्या अशा काही कामचलाऊ आयांचा मी सन्मान करतेय. त्याचबरोबर ‘आई’ या नात्याने मला सामाजिक आणि राजकीय जागरूकता करून दिल्याचेही स्कॉरलेट म्हणतेय. 

हॉलिवूडमध्ये बºयाचशा सिनेमांमध्ये स्वत:ला सिद्ध केलल्या स्कॉरलेटची गणना यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. कदाचित याच व्यस्त लाइफस्टाइलमध्ये ती परिवाराला हवा तसा वेळ देऊ शकले नाही. मात्र आता तिला अधिकवेळ मुलांना द्यायचा असून, त्यांच्या पालनपोषणाबाबतचे सर्व कर्तव्य पार पाडायचे आहेत. सध्या ती याविषयी एकप्रकारे शिक्षण घेत असून, मुलांना आनंदी ठेवण्यासाठी तिचा पुरेपूर प्रयत्न असतो. स्कॉरलेट मुलांना वेळ देत असल्याने तिच्या परिवारातही आनंदाचे वातावरण असून, मुले तिच्यासोबत खूप धमाल मस्ती करीत असल्याचेही तिने म्हटले आहे. 

Web Title: Scorlett Johnson says it is challenging to have a permanent mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.