चष्म्याविना बघता येईल ‘अवतार’चा सीक्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2016 08:01 PM2016-11-03T20:01:02+5:302016-11-03T20:01:02+5:30

फिल्म प्रोड्यूससर जेम्स कॅमरूनला विश्वास आहे की, त्यांचा ‘अवतार’ या चित्रपटाचा सीक्वल थ्रीडीच्या अ‍ॅडव्हॉन्स तंत्राने बनविण्यात त्यांना यश येईल. ...

The sequel of 'Avatar' can be seen without the eyeglasses | चष्म्याविना बघता येईल ‘अवतार’चा सीक्वल

चष्म्याविना बघता येईल ‘अवतार’चा सीक्वल

googlenewsNext
ल्म प्रोड्यूससर जेम्स कॅमरूनला विश्वास आहे की, त्यांचा ‘अवतार’ या चित्रपटाचा सीक्वल थ्रीडीच्या अ‍ॅडव्हॉन्स तंत्राने बनविण्यात त्यांना यश येईल. या तंत्राने बनविल्यास प्रेक्षकांना चष्मा न घालताच हा चित्रपट बघता येईल. 
२००९ मध्ये प्रसिद्ध झालेला अवतार थ्री डी तंत्राने बनविण्यात आला होता. मात्र, त्यावेळी प्रेक्षकांना चष्मा परिधान करून हा चित्रपट बघावा लागला. तरी सुद्धा सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत त्याची नोंद करण्यात आली होती. 
आता कॅमरून त्यापेक्षा अ‍ॅडव्हॉन्स तंत्राचा वापर करून चित्रपटाचा सीक्वल तयार करीत आहे. कॉन्टॅक्ट म्युझिकने दिलेल्या माहितीनुसार अवतारचा थ्री डी सीक्वल बघताना प्रेक्षकांनी चष्म्यांचा आधार घेवू नये अशी कॅमरून यांची इच्छा आहे. त्यासाठी ते अ‍ॅडव्हॉन्स तंत्राचा आधार घेवून हा चित्रपट बनवित आहेत. याविषयी बोलताना कॅमरूनने सांगितले की, सध्या मी या मोठ्या शोधाच्या अगदीच जवळ आहे. प्रेक्षकांचे चित्रपट बघण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यांना अ‍ॅडव्हॉन्स तंत्राचे सिनेमे भावतात. त्यामुळेच आम्ही हा आगळा-वेगळा प्रयोग करण्याचा विचार केला आहे. मला असे वाटते की, चष्मा परिधान न करताच तुम्ही थ्री डी चित्रपटांचा आनंद घेवू शकता. असे झाल्यास प्रेक्षकांना वेगळी अनुभूती येईल यात शंका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: The sequel of 'Avatar' can be seen without the eyeglasses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.