Games of Thrones Sequel: जे बात! ‘जॉन स्नो’ परत येतोय... बस थोडा सा इंतजार...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:51 PM2022-09-30T18:51:15+5:302022-09-30T19:01:12+5:30
Games of Thrones Sequel : ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, जॉन स्नो पुन्हा एकदा परततोय.
Games of Thrones Sequel : ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’च्या (Games of Thrones) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, जॉन स्नो (Jon Snow) पुन्हा एकदा परततोय. जॉन स्रोची भूमिका साकारणारा चाहत्यांचा लाडका अभिनेता किट हँरिग्टन पुन्हा एकदा रोमांचक कारनामे दाखवण्यास सज्ज झाला आहे.
जगभरातील ओटीटी माध्यमाचा जो प्रेक्षकवर्ग आहे त्याला एका मालिकेचं नाव हे माहिती असतचं. ती मालिका म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स. या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. याच जगभर धुमाकूळ घालणाऱ्या सीरिजमधील जॉन स्नो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
जॉन स्नोच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या डिसेंबरमध्ये ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’च्या सीक्वलचं शूटींग सुरू होणार आहे. हा सीक्वल जॉन स्नोवर आधारित असणार आहे. 2023 च्या अखेरिस वा 2024 च्या सुरूवातीला हा सीक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळेल अशी अपेक्षा असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘गेम्स ऑफ थ्रोन्स’च्या 8 व्या व शेवटच्या सीझनमध्ये जॉन स्नोला त्याची खरी ओळख कळते. तो आयरन थ्रोनचा संभाव्य उत्तराधिकारी होता आणि त्याचं नाव एगॉन टार्गेरियन होतं. तर आता याच जोन स्रोवर आधारित ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’च्या सीक्वलचं काम सुरु झालं आहे.
‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ हा शो डेव्हिड बेनिओफ्फ आणि डी. बी. वेइसद्वारा निर्मित एका अमेरिकन काल्पनिक नाटकाची टीव्ही शृंखला आहे. हे नाटक जॉर्ज आर. आर. मार्टिनच्या अ साँग ऑफ आइस अॅण्ड फायर या काल्पनिक कादंबरीवर आधारित आहे. ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’ ने भारतीयांनाही वेड लावलं आहे.