लग्नापूर्वीच शकीरा झाली २ मुलांची आई; आता लॉग टाइम पार्टनर जेरार्डपासून होणार विभक्त?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 01:23 PM2022-06-02T13:23:38+5:302022-06-02T13:25:01+5:30
Shakira and gerard pique: शकीरा जवळपास १२ वर्षांपासून फुटबॉलपटू जेरार्ड पिकला डेट करत आहे. या दोघांना दोन मुलंदेखील आहेत.
पॉप स्टार शकीरा (Shakira) कायम तिच्या दमदार आवाजामुळे चर्चेत येत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. शकीरा जवळपास १२ वर्षांपासून फुटबॉलपटू जेरार्ड पिकला (Gerard Pique) डेट करत आहे. या दोघांना दोन मुलंदेखील आहेत. मात्र, लॉग टाइम रिलेशनशीप असलेली ही जोडी आता विभक्त होण्याच्या मार्गावर आहे. जेरार्डने फसवणूक केल्यामुळे शकीराने त्याच्यापासून स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला आहे.
El Periodico journalist, Emilio Perez de Rozas च्या माहितीनुसार, शकीरा आणि जेरार्ड २०१० पासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, शकीराने जेरार्डला एका अन्य महिलेसोबत रंगेहात पकडल्यामुळे तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेमात दगा दिल्यामुळे दु:खी झालेल्या शकीराने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सूत्रांच्या माहितीनुसार, जेरार्ड शकीरासह अन्य दुसऱ्या महिलेलाही डेट करत होता. या दोघांना शकीराने एकत्र पाहिलं ज्यामुळे तिने जेरार्डला सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या, जेरार्ड, शकीराच्या घरातून त्याचं सामान गोळा करत असल्याचं सांगण्यात येतं. जेरार्डचं गेल्या कित्येक दिवसांपासून वागणं बदललं होतं. दोन मुलांचा पिता असलेला जेरार्ड पार्टी लाइफस्टाइलच जगत होता. रोज नाईटक्बलमध्ये जाणं, मज्जा मस्ती करणं यात तो गुंग होता. त्यामुळेच शकीरा व त्याच्या नात्यात दुरावा आला, असं सांगण्यात येतं.
१२ वर्षांचं नातं येणार संपुष्टात?
2000 साली शकीरा Argentinian लॉयर Antonio de la Rua ला डेट करत होती. जवळपास १० वर्ष एकत्र राहिल्यानंतर ते विभक्त झाले. त्यानंतर तिने स्पॅनिश फुटबॉलपटू जेरार्ड पिकला डेट करण्यास सुरुवात केली. जेरार्ड, शकीरापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. या दोघांची पहिली भेट शकीराच्या गाजलेल्या 'वाका वाका' या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान झाली होती. 2013 मध्ये शकीराने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर 2015 मध्ये तिला दुसरा मुलगा झाला. शकीरा आणि जेरार्ड यांचा समावेश फोर्ब्सच्या यादीत मोस्ट पॉवरफूल कपल म्हणून करण्यात आला आहे. मात्र, आता ही जोडी विभक्त होणार असल्याचं म्हटलं जातं.