शुमर चिडली ‘ट्रम्प’ समर्थकांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2016 12:54 PM2016-11-13T12:54:48+5:302016-11-13T12:54:48+5:30

प्रसिद्ध इंग्लिश कॉमेडिअन एमी शुमर सध्या ‘विनोदा’च्या मूडमध्ये दिसत नाहीए. ‘ट्रम्प अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मी देश सोडून जाईल’ या ...

Shumar Chidley supports 'Trump' supporters | शुमर चिडली ‘ट्रम्प’ समर्थकांवर

शुमर चिडली ‘ट्रम्प’ समर्थकांवर

googlenewsNext
रसिद्ध इंग्लिश कॉमेडिअन एमी शुमर सध्या ‘विनोदा’च्या मूडमध्ये दिसत नाहीए. ‘ट्रम्प अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मी देश सोडून जाईल’ या तिच्या विधानामुळे तिच्यावर लोक आता देश सोडून जाण्याची तयारी कर म्हणून दबाव टाकत आहेत.

हिलरी क्लिंटनचा पराभव करून डोनाल्ड ट्रम्प प्रेझिडेंट बनले आणि एमीवर सोशल मीडियावर टीका सुरू झाली. याचे चोख उत्तर देणारे पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. यामध्ये तिने ट्रम्प समर्थकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. मी देश सोडून जाणार नाही, असे तिने ठासून सांगितले.

ती लिहिते, ‘सर्वप्रथम तर ट्रम्प जिंकल्यावर मी देश सोडून जाईल, असे मी विनोदाने म्हटले होते. त्यामुळे तो विषय जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मी कॉमेडिअन आहे. विनोद म्हणून मी अनेक स्टेटमेंट करते. ते सर्वच जर तुम्ही शब्दश: घेणार असाला तर यातून तुमचा अज्ञानीपणा दिसून येते.’


शट-अप? : डोनाल्ड ट्रम्प आणि एमी शुमर

सप्टेंबर महिन्यात एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली होती की, ‘व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प आल्यावर मी स्पेनला स्थलांतरित होण्याचा विचार करत आहे. पण त्यासाठी मला स्पॅनिश भाषा शिकावी लागेल. तो व्यक्ती अमेरिकेचा अध्यक्ष होणे माझ्या समजण्या पलीकडे आहे. खरंच तसे झाले तर काही खरं नाही.’

इन्स्टाग्रामवर ती पुढे लिहिते, ‘जे कोणी लोक मला देश सोडून जा म्हणून सांगताहेत, त्यांची मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. अशाच लोकांनी तर ट्रम्पसारख्या वर्णभेदी आणि स्त्रियांचा पदोपदी अपमान करणाऱ्या व्यक्तीला निवडून दिले आहे. लाखो लोकांप्रमाणे माझे मनसुद्धा खूप दु:खी आहे. माझ्या गर्भवती मैत्रिणींसाठी तर मला खूप वाईट वाटते की, अशा काळात त्यांचे मूल जन्माला येणार आहे.’

रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार डोनाल्ड ट्रम्प समर्थकांना फैलावर घेत ती म्हणते, ‘तुमच्यासारख्या अविचारी आणि अज्ञानी लोकांमुळे अमेरिकेवर ही वेळ आली आहे. हिलरी यांना कोठडीत डांबण्याची गोष्ट करणाऱ्यांनो एकदा जरा त्यांच्यावरील आरोप खरे की खोटे याची पडताळणी करण्याचे कष्ट घ्या.’

Web Title: Shumar Chidley supports 'Trump' supporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.