ड्रग्स ओव्हरडोजमुळे 'ही' प्रसिद्ध गायिका रुग्णालयात दाखल, प्रियंका चोप्राने केलं ट्विट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 13:49 IST2018-07-26T13:47:25+5:302018-07-26T13:49:06+5:30
ड्रग्स ओव्हरडोजचा खुलासा तिच्या प्रवक्त्याने केलाय. ऑफिशिअल चार्ट या अमेरिकन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, डेमी लोवेटो हिला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

ड्रग्स ओव्हरडोजमुळे 'ही' प्रसिद्ध गायिका रुग्णालयात दाखल, प्रियंका चोप्राने केलं ट्विट!
मुंबई : 'हार्ट अटॅक', 'स्टोन कोल्ड' आणि 'टेल मी यू लव्ह मी' या गाण्यांमुळे लाखो मनांवर राज्य करणारी गायिका डेमी लोवेटो हिला ड्रग्स ओव्हरडोसमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. ड्रग्स ओव्हरडोजचा खुलासा तिच्या प्रवक्त्याने केलाय. ऑफिशिअल चार्ट या अमेरिकन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, डेमी लोवेटो हिला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या डेमीची प्रकृती स्थिर आहे. डेमीच्या चाहत्यांना ही बातमी कळताच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यासाठी प्रार्थना करणारे संदेश शेअऱ केलेत. त्यात लेन डिजेनेरस, लिली एलन, लेडी गागा, किम कार्दीशिया, सॅम स्मिथ यांच्यासह हॉलिवूडच्या अनेक स्टार्सचा समावेश आहे.
Strength and prayers🙏🏽 @ddlovato#PrayForDemi
— PRIYANKA (@priyankachopra) July 25, 2018
सध्या अमेरिकन गायक निक जोनस याला डेट करत असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्राने सुद्धा डेमी लोवेटो लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करणारी पोस्ट ट्विटरवर शेअऱ केली आहे. महत्वाची बाब म्हणजे डेमी लोवेटो ही निक जोनसच्या भावाची एक्स गर्लफ्रेन्ड आहे.