सिंगर जस्टिन बीबरला झाला हा गंभीर आजार, व्हिडीओ पाहून चाहते पडले चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 11:18 AM2022-06-11T11:18:30+5:302022-06-11T11:19:05+5:30
Justin Bieber: जस्टिन बीबरचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत.
जस्टिन बीबर (Justin Bieber) जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. अलीकडेच, गायकाने त्याच्या 'जस्टिस' अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याने त्याचा दौरा पुढे ढकलला. ही बातमी कळताच जगभरातील त्याचे चाहते नाराज झाले. त्याचवेळी, गायकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्यामागील कारण स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये, जस्टिनने सांगितले की, त्याच्या अर्धा चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे.
जस्टिन बीबरने खुलासा केला की तो रामसे हंट सिंड्रोमने ग्रस्त आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या स्थितीबद्दल बोलताना, गायक म्हणाला, "तुम्ही बघू शकता, मी माझे डोळे मिचकावू शकत नाही. मी माझ्या चेहऱ्याच्या या बाजूलाही हसू शकत नाही. माझा शो रद्द झाल्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की मी यावेळी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. मला आशा आहे की तुम्ही लोक समजून घ्याल.
जस्टिन म्हणाला की त्याला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे माहित नाही. तथापि, तो विश्रांती आणि थेरपीद्वारे पूर्ण बरा होण्यासाठी प्रयत्न करतो आहे. "सध्या मी फक्त विश्रांती घेत आहे आणि पूर्णपणे बरा होण्याचा आणि सेटवर परत येण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून मी जे करण्यासाठी जन्मलो ते करू शकेन,", असे जस्टिन म्हणाला. या वर्षी मार्चमध्ये जस्टिन बीबरची पत्नी हेलीच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
चाहते करताहेत प्रार्थना
व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते जस्टिनला लवकर बरे वाटावे, म्हणून प्रार्थना करत आहेत. एका युजरने लिहिले, "जस्टिन, शोची काळजी करू नको. तुमचे चाहते फक्त तुमच्या आरोग्याची काळजी घेतात. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. मला खात्री आहे की तुम्ही लवकरच बरे व्हाल आणि स्टेजवर परत याल. प्रेम. आम्ही आहोत. नेहमी तुझ्यासोबत आहे. ️" तर दुसर्याने लिहिले, "आरोग्य हीच संपत्ती आहे. तुला माझ्या प्रार्थनेत ठेवत आहे आणि तू लवकर बरा होवो ही शुभेच्छा. जस्टिन काळजी घे, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो ️"