प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, कार्डियक अरेस्टने ३२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 05:46 PM2024-12-03T17:46:18+5:302024-12-03T17:46:40+5:30
सिनेविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेत्याचं निधन झालं आहे.
सिनेविश्वातून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध साऊथ कोरियन अभिनेत्याचं निधन झालं आहे. कोरियन अभिनेता Park Min Jae यांचा मृत्यू झाला आहे. तो ३२ वर्षांचा होता कार्डियक अरेस्टने त्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी(२९ नोव्हेंबर) त्याने या जगाचा निरोप घेतला. Park Min Jaeच्या एजन्सीकडून त्याच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे.
Park Min Jae च्या निधनाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने कोरियन सिनेइंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. Park Min Jae च्या बिग टायटल या एजन्सीकडून त्याच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात आला आहे. "एक उत्तम अभिनेता ज्याला त्याच्या कामावर प्रेम होतं आणि नेहमी ज्याने त्याचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. Park Min Jae याचं निधन झालं आहे. तुम्ही त्याला दिलेलं प्रेम आणि पाठिंबा यासाठी आभारी आहोत. जरी आता आपल्याला त्याचा अभिनय बघता येणार नसला तरी एक उत्तम अभिनेता म्हणून तो कायमच स्मरणात राहील. त्याच्या आत्म्याला शांती मिळो", असं एजन्सीने म्हटलं आहे.
चीनमध्ये असताना Park Min Jae चं निधन झालं. बुधवारी(४ डिसेंबर) त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 'टॉमॉरो', 'लिटिल वुमन', 'कॉल इट लव्ह', 'द कोरिया-खितान वॉर' आणि 'मि. ली' यांसारख्या टेलिव्हिजन सीरिजमध्ये त्याने काम केलं होतं.