रिल लाइफ गर्लफ्रेंड होणार रिअल लाइफ बायको? 'स्पायडरमॅन' फेम कपलच्या साखरपुड्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:18 IST2025-01-07T12:17:58+5:302025-01-07T12:18:57+5:30
सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेते 'स्पायडरमॅन' सिनेमाने लोकप्रिय झालेल्या कलाकारांच्या साखरपुड्याची जगभरात चर्चा आहे (tom holland, zendaya)

रिल लाइफ गर्लफ्रेंड होणार रिअल लाइफ बायको? 'स्पायडरमॅन' फेम कपलच्या साखरपुड्याची चर्चा
'स्पायडरमॅन' सिनेमाची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये क्रेझ आहे. सुपरहिरो असलेल्या 'स्पायडरमॅन'ची भूमिका आतापर्यंत तीन अभिनेत्यांनी साकारली. टोबी मॅग्वायर, अँड्र्यू गारफिल्ड आणि टॉम होलंड या तीनही कलाकारांनी साकारलेले 'स्पायडरमॅन' चांगलेच लोकप्रिय झाले. अशातच जगभरात लोकप्रिय असलेलं 'स्पायडरमॅन' फेम कपल टॉम होलंड आणि जेंडाया यांनी साखरपुडा केला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही अभिनेत्यांच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झालाय.
'स्पायडरमॅन' फेम कपलने केला साखरपुडा
'स्पायडरमॅन' फेम कपल टॉम होलंड आणि जेंडाया यांनी साखरपुडा केला असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामागचं कारण म्हणजे अभिनेत्री जेंडायाचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झालाय. या फोटोत तिच्या बोटात असलेल्या डायमंड रिंगकडे सर्वांचं लक्ष वेधलंय. टॉम आणि जेंडाया एकमेकांना २ वर्षांपासून डेट करत होते. दोघांच्या रोमँटिक फोटोंची चर्चा आहे. जेंडायाने टॉमच्या नावाचा टॅटूही गोंदवला असल्याची चर्चा आहे. आता सर्वांना जेंडायाच्या बोटातील अंगठी दिसल्याने दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलंय. दोन्ही कलाकारांनी ऑफिशिअली साखरपुड्याचा खुलासा केला नाहीये.
जेंडायाच्या डायमंड रिंगची किंमत कोटींच्या घरात
TMZ च्या मीडिया रिपोर्टने टॉम आणि जेंडायाच्या साखरपुड्याच्या बातमीला दुजोरा दिलं आहे. याशिवाय इकॉनॉमिक टाइम्सनुसार जेंडायाच्या डायमंड रिंगची किंमत १.७१ कोटी इतकी आहे. अशाप्रकारे रिल लाइफमध्ये गर्लफ्रेंड - बॉयफ्रेंड असणारे टॉम-जेंडाया आता रिअल लाइफमध्ये एकमेकांचे लाइफ पार्टनर झाले आहेत. दोघांनी अजूनही अधिकृतपणे जाहीर केलं नसलं तरीही चाहत्यांनी दोघांचं अभिनंदन केलंय.